ताज्याघडामोडी

प्रसंगी रक्त सांडु पण उजनी धरणातून एक थेंब ही पाणी जाऊ देणार नाही – माऊली हळणवर 

मोहोळ आज आज मोहोळ येथे उजनी पाणी संघर्ष समिती च्या वतीने बैठक झाली या बैठकीमध्ये तीव्र भावना व्यक्त करण्यात येत होत्या.

सोलापूर जिल्ह्यातील आष्टी उपसा सिंचन, शिरापूर उपसा सिंचन, सीना-माढा उपसा सिंचन, एकरुख उपसा सिंचन, मंगळवेढा ३५ गाव उपसा सिंचन, सांगोला उपसा सिंचन, सीना भीमा उपसा सिंचन, दहिगाव उपसा सिंचन या उजनी जलाशयावर चालणाऱ्या योजना आजही अपूर्ण असताना इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोणी उपसा सिंचन साठी पवार ठाकरे सरकार कोट्यवधी रुपये देतात हा खुनाशी डाव आहे. उजनी जलाशय हे सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे असून योजनेचे नाव बदलून अथवा जुनी योजना आहे असे सांगून सोलापूरकरांच्या डोक्यात दगड घालण्याचे महापाप बारामती आणि इंदापूरकर करत असून उजनीचे पाणी लाल झाले तरी बेहत्तर हा डाव आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही  असा इशारा उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीने दिला आहे.

 

इंदापूर तालुक्यातील लाकडी-निंबोणी उपसा सिंचन योजनेला ३४८ कोटी रुपये मंजूर केल्याचा अध्यादेश निघाल्यानंतर मोहोळ येथील शासकीय विश्रामगृहात उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीची तातडीची बैठक पार पडली. यावेळी विविध पक्षाच्या आणि संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी बोलताना जलतज्ञ अनिल पाटील म्हणाले की, इंदापूरकर यांनी अत्यंत चुकीच्या पद्धतीने पाणी पळविण्याचा डाव आखला आहे. वास्तविक पाणी नेण्यासाठी उजनीमध्ये एक थेंबही पाणी शिल्लक नाही. मात्र या बद्दल बोलायला कोणीही लोकप्रतिनिधी शिल्लक नाही हे मोठे दुर्दैव आहे. युवा भिम सेनेचे महेश डोलारे म्हणाले की सोलापूर शहरात आठ दिवसाला पाणी येते, आमचे पाणी नेऊन महिन्याला एकदा देणार का..? निर्णय रद्द नाही झाला तर पालकमंत्र्यांना सोलापुरात पाय ठेवू देणार नाही. शिवसेनेचे सोमेश क्षीरसागर म्हणाले की, बारामतीकरांनी घेतलेला हा निर्णय मुख्यमंत्र्यांना कदाचित माहीत नसावा, याबाबत मी लवकरच वर्षा अथवा मातोश्री निवासस्थानी भेट घेऊन उजनी बाबत ची वस्तूस्थिती सांगणार आहे.

यावेळी उजनी पाणी संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे, सचिव माऊली हळणवर, कार्याध्यक्ष सुहास घोडके, जलतज्ञ अनिल पाटील, संजय पाटील घाटणेकर ,दत्तात्रय मोरे, भाजपचे भारत माने, शिवसेनेचे सोमेश क्षीरसागर, वाल्मिकी महासंघाचे गणेश अंकुशराव, लक्ष्मणराव धनवडे, ऍड. बापूसाहेब मेटकरी, भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब जाधव, धनाजी गडदे, विठ्ठल मस्के, भाजपचे शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर, महेश डोलारे, दिलीप गायकवाड, द्रोणाचार्य लेंगरे, नीलेश जरग, गणेश शेटे, गणेश चव्हाण, विकास गायकवाड, आनंद जाधव यांच्यासह उजनी संघर्ष समितीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *