ताज्याघडामोडी

चक्क गंगा नदीत लपवून ठेवली हजारो लिटर अवैध दारू; उत्पादन शुल्क विभागाकडून जप्त

बिहारमध्ये दारूबंदी असूनही दारुचे अवैध धंदे सुरुच आहेत. मद्यतस्करांनी आता चक्क नदीतच दारू लपवून ठेवल्याची घटना सारण जिल्ह्यातील छपरामध्ये उघडकीस आली आहे. सारण जिल्ह्यातील नदीत माशांचे प्रमाण अचानक कमी झाले आणि पाण्याला फेस येत होता.

त्यामुळे पाहणी केल्यावर ही घटना उघडकीस आली आहे.

बिहारमध्ये दारुविरोधात आणि मद्यतस्करांविरोधातील कारवाईला गती देण्यात आल्याने तस्करांनी आता थेट नदीतच दारू लपवण्यास सुरुवात केल्याचे उघडकीस आले आहे. डायरा परिसरात ड्रोनद्वारे छापे टाकून अवैध दारू नष्ट करण्यात आली होती. त्यानंतर तस्करांनी ड्रोनद्वारे दारू शोधता येऊ नये, यासाठी नदीतच दारू लपवली होती.

तस्करांनी लपवलेली दारू शोधण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. ड्रोनद्वारे दारू शोधता येत नसल्याने उत्पादन शुल्क विभागाने बोटींद्वारे शोधमोहीम सुरू केली आहे. विभागाचे छापे सातत्याने सुरू आहेत. तस्करांनी निळ्या पोत्यांमध्ये दारू लपवून ठेवली आहे. विभागाने संशयाच्या आधारे काही ठिकाणे हेरून तिथे छापे टाकले. त्यानंतर त्यांना आढळलेला मद्याचा साठा पाहून त्यांनाही धक्का बसला.

छपरा आणि दियारा परिसरात दारूविरोधात छापे सुरू आहे. या मोहीमेत अवतार नगर येथे मोठ्या प्रमाणात देशी दारू जप्त करून ती नष्ट करण्यात आली. या ठिकाणी दारू बनवण्याचा माल नदीत लपवून ठेवण्यात आला होता, पथकाने बोटीद्वारे तिथे पोहोचल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने ती नष्ट केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *