ताज्याघडामोडी

आषाढी वारीत पंढरपूर नगरपरिषदेने केलेल्या रस्त्यांच्या कामाची चौकशी करा, पंढरपूर शहर कॉंग्रेसची मागणी

पंढरपूर – आषाढी वारीत व पावसाळा सुरू होताना अचानक घाई गडबडीत टेंडर काढून पंढरपूर नगरपरिषदेेच्यावतीने पंढरपूर शहरातील विविध भागातील रस्ते दुरूस्तीचे व खड्डे बुजविण्याचे काम केले ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून पावसाच्या सुरूवातीलाच सर्वत्र रस्ते पुन्हा खड्डेमय झालेले आहेत.रस्ते दुरूस्ती केलेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली असून अनेक ठिकाणी रस्त्यावरील खड्‌ड्यांवर टाकलेला भराव […]

ताज्याघडामोडी

दारूच्या नशेत तो बहिणीला मारायला गेला, धाकटा भाऊ आणि जावयाने उचलले टोकाचे पाऊल

नागपूर जिल्ह्यातील रामटेकच्या देवलापार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पिंडकापर (लोढा) गावात रविवारी रात्री सख्ख्या भावाने आणि जावयाने मिळून एका तरुणाला संपवून टाकले. देवलापार पोलिसांनी तीन तासात दोन्ही आरोपींना अटक केली आहे. नरेश जयसिंग वरठी (३०) असे मृताचे नाव असून महेश जयसिंग वरठी (२७) आणि जावई संजय श्रीराम इनवाते (४०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. […]

ताज्याघडामोडी

ऑगस्टमध्ये 13 दिवस बंद राहणार बँका, सुट्ट्यांची यादी पाहा

रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियने बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी अपडेट दिली आहे. ऑगस्ट महिन्यात 14 महिने बँका बंद राहणार आहात, आरबीआयकडून ग्राहकांना हा अलर्ट जारी करण्यात आला आहे.ग्राहकांचे बँकेसंबंधीत काही कामे असतील ती हे 14 दिवस वगळताच करुन घ्या,असंही अवाहन आरबीआयकडून करण्यात आलं आहे. आरबीआय वेळोवेळी बँका संबंधित काही अपटेड जारी करत असतात. आताही आरबीआयने बँकांना असलेल्या […]

ताज्याघडामोडी

महिलांची वारंवार काढायचा छेड, संतापलेल्या तरुणांनी गावगुंडाला दाखवला इंगा, अन् होत्याचं नव्हतं झालं

उमरेडमधील बेला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिखलापार येथे शुक्रवारी तीन तरुणांनी एका गावगुंडाची हत्या केली. मृतक हा रोज गावातील महिलांची छेड काढत असे. यावरून त्याची गावातील काही तरुणांशी बाचाबाची झाली. त्यात लाठ्या-काठ्यांनी जोरदार मारामारी होऊन मृतक जखमी झाला. उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेण्यात […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या १० विद्यार्थ्यांची “कॉग्निझंट” कंपनीत निवड

कॉग्निझंट टेक्नॉलॉजी सोल्युशन्स कॉर्पोरेशन ही एक माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील बहुराष्ट्रीय कंपनी आहे. या कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील शिक्षण घेतलेल्या १० विद्यार्थ्यांची जगातील नामवंत असलेल्या “कॉग्निझंट” कंपनीत कॅम्पस इंटरव्हूवद्वारे निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयात काॅम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील […]

ताज्याघडामोडी

दुचाकीवरून परतत होतं जोडपं; घाटात पुढील बसचा ब्रेक फेल, तुटली सहजीवनाची दोर

वाईहून महाबळेश्वरकडे जात असताना बुवासाहेब मंदिराजवळ अवघड वळणावर अचानक बसचा ब्रेक फेल झाला. या बसच्या पाठीमागे दुचाकीस्वार पत्नीसह पाचगणीकडे चालला होता. ब्रेक फेल झाल्यानंतर बस पाठीमागे येत असताना चालकाने बस नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. पण बस पाठीमागे सरकल्याने पाठीमागून आलेल्या दुचाकीवर बस गेल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. प्रीती योगेश बोधे (४०) असे मृत […]

ताज्याघडामोडी

आ.आवताडे यांच्या प्रयत्नांतून म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे पाणी सोडण्याच्या मागणीला यश

पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये अपेक्षेप्रमाणे पर्जन्यमान न झाल्याने अनेक शेतकरी व पशुपालक पाण्याअभावी अक्षरशः हवालदील झाले आहे. दक्षिण भागाच्या सदर गावातील नागरिकांनी या योजनेचे पाणी सोडण्याबाबत आमदार आवताडे यांच्याकडे मागणी केली होती. या भागातील जनतेच्या सदर मागणी अन्वये म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत पाणीटंचाई असलेल्या मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील सर्व तलाव, बंधारे पाण्याने भरून देण्याबाबत […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

उसने पैसे न दिल्याचा राग, नवऱ्यासमोर बायकोचा विनयभंग; आरोपीची पोलिसांनी काढली धिंड

उसने दिलेले पैसे परत न दिल्याने एका नराधमाने पतीला चाकूचा धाक दाखवून त्याच्या समोरच पैसे उसने घेणाऱ्याच्या पत्नीचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार पुण्यातील हडपसर परिसरात उघडकीस आला आहे. ही घटना घडल्यानंतर त्या नराधमाची हडपसर परिसरात गुरुवारी भरपावसात पोलिसांनी धिंड काढली. इम्तियाज हशीम शेख (वय ४७, म्हाडा कॉलनी, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या १२ विद्यार्थ्यांची टीसीएस कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड

देशातील विविध नामांकित कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मधील विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत आहेत. सिंहगड संस्थेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान सेवा, व्यापाराभिमुख प्रणाली सेवा आणि आउंटसोर्सिंग सेवा पुरवठा या क्षेत्रात काम करण्याची संधी प्राप्त होत असून “टीसीएस” कंपनीत पंढरपूर सिंहगड कॉलेज मधील १२ विद्यार्थ्यांना कॅम्पस प्लेसमेंट मधुन नोकरी मिळाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट […]

ताज्याघडामोडी

राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर ओसरणार; मान्सूनबाबत हवामान विभागाचा नवा अंदाज

राज्यभरात पावसानं धुमाकूळ घातला आहे. संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. या पुराचा मोठा फटका सामान्य नागरिकांना बसला आहे. अनेकांच्या घरात पुराचं पाणी शिरल्यामुळे संसार वाहून गेला. लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली आल्यानं बळीराजावर दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे. मात्र यातच आता एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. पुणे वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील काही दिवस […]