वाईहून महाबळेश्वरकडे जात असताना बुवासाहेब मंदिराजवळ अवघड वळणावर अचानक बसचा ब्रेक फेल झाला. या बसच्या पाठीमागे दुचाकीस्वार पत्नीसह पाचगणीकडे चालला होता. ब्रेक फेल झाल्यानंतर बस पाठीमागे येत असताना चालकाने बस नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला. पण बस पाठीमागे सरकल्याने पाठीमागून आलेल्या दुचाकीवर बस गेल्याने झालेल्या अपघातात दुचाकीवरील महिलेचा मृत्यू झाला. प्रीती योगेश बोधे (४०) असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. त्या किसन वीर कॉलेज येथे प्राध्यापिका होत्या. हा अपघात सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, वाईहून महाबळेश्वरच्या दिशेने जाणाऱ्या बसचा (क्रमांक एमएच ०६ एस ८०५४) पसरणी घाटात ब्रेक फेल झाला. चालकाच्या ही बाब लक्षात येताच चालकाने बस कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत बस नाल्याच्या दिशेने घसरली. दरम्यान, पाठीमागून येणाऱ्या दुचाकीस्वारास पाठीमागे बस येत असल्याचे समजले नाही. त्यामुळे बस खाली दुचाकी (क्रमांक एमएच ११ एयु ६०६७) सापडल्याने दुचाकीवरील दोघेही बसच्या पाठीमागील बाजूस सापडले. त्यात महिलेचा मृत्यू झाला. प्रीती योगेश बोधे असे मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. वाई येथील किसन वीर महाविद्यालयात कनिष्ठ महाविद्यालय विभागात प्राध्यापिका होत्या. सायंकाळी कॉलेजला सुट्टी झाल्यानंतर त्या पतीसमवेत वाई येथील डी मार्टमध्ये साहित्य घेऊन ते दोघे पाचगणीला जात होते.