ताज्याघडामोडी

ऑगस्टमध्ये 13 दिवस बंद राहणार बँका, सुट्ट्यांची यादी पाहा

रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियने बँकेच्या ग्राहकांसाठी मोठी अपडेट दिली आहे. ऑगस्ट महिन्यात 14 महिने बँका बंद राहणार आहात, आरबीआयकडून ग्राहकांना हा अलर्ट जारी करण्यात आला आहे.ग्राहकांचे बँकेसंबंधीत काही कामे असतील ती हे 14 दिवस वगळताच करुन घ्या,असंही अवाहन आरबीआयकडून करण्यात आलं आहे. आरबीआय वेळोवेळी बँका संबंधित काही अपटेड जारी करत असतात. आताही आरबीआयने बँकांना असलेल्या सुट्टयांची यादी जारी केली आहे. 

ऑगस्ट महिन्यात देशातील वेगवेगळ्या राज्यात सण साजरे करण्यात येत आहे. देशातील एकूण राज्यांतील सुट्ट्यांचा आकडा हा 14 इतका आहे. इतकेंच नव्हे तर काही लाँग विकेंडदेखील येणार आहे. आरबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार, दुसरा आणि चौथ्या शनिवारी बँकांना सुट्टी असते. ऑगस्ट महिन्यात कोणतेही कामकाज करताना करताना सुट्ट्यांच्या यादीवर एकदा नजर टाकाच. 

6 ऑगस्ट रोजी रविवारी असल्याने बँक बंद असणार आहेत. 

8 ऑगस्ट रोजी गंगटोकमध्ये तेन्दोंग ल्हो रम फात या कारणामुळं बँकेला सुट्टी असेल

12 ऑगस्ट रोजी दुसऱ्या शनिवारी बँका पूर्ण देशात बंद असणार आहेत.

13 ऑगस्ट रोजी रविवार असल्याने बँकेला सुट्टी असेल

15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन असल्याने बँकांना सुट्टी असेल

16 ऑगस्ट रोजी पारसी नववर्ष असल्याने मुंबई, नागपूर आणि बेलापूरमध्ये बँकांना सुट्टी असेल.

18 ऑगस्ट रोजी श्रीमंत शंकरदेव तिथीमुळं गुवाहाटीमध्ये बँका बंद असतील.

20 ऑगस्ट रोजी रविवार असल्याने बँका बंद असणार आहेत

26 ऑगस्ट रोजी चौथा शनिवार असल्याने संपूर्ण देशात बँका बंद असतील 

27 ऑगस्ट रोजी रविवार असल्याने बँकांना सुट्टी असेल

28 ऑगस्ट रोजी ओणममुळं कोच्चि आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद असतील

29 ऑगस्ट रोजी तिरुओणममध्ये कोच्चि आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद राहतील

30 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यामुळं जयपूर आणि शिमलामध्ये बँकांना सुट्टी असेल. 

31 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन /श्री नारायण गुरु जयंती/पंग-लहबसोलमुळं देहरादून, गंगटोक, कानपुर, कोच्चि,लखनऊ आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद असणार आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *