ताज्याघडामोडी

‘भाजपचे किती नेते मला भेटले याची माहिती घ्या’

मुंबई, 23 एप्रिल : ‘अजित पवार जनतेच्या, जनप्रतिनिधींच्या नेटवर्कमध्ये राहणारा कार्यकर्ता आहे. न्यूज चॅनलच्या पडद्यावर दिसण्यासाठी अभिनय करणाऱ्या, खोट्या प्रसिद्धीसाठी धडपडणाऱ्या नेत्यांपैकी मी नाही. दररोज काहीतरी बरळल्याशिवाय ज्यांचे चेहरे टीव्हीवर दिसू शकत नाहीत, अशी मंडळी अलिकडे माझ्यावर दररोज बिनबुडाचे आरोप करत आहेत,’ असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप नेत्यांवर जोरदार पलटवार केला आहे. […]

ताज्याघडामोडी

राज्यात एसटी चालू राहणार, पण तुम्हाला प्रवास करता येणार का? जाणून घ्या

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कडक लॉकडाऊनची घोषणा बुधवारी करण्यात आलीय. राज्याच्या मुख्य सचिवांनी त्याबाबत एक परिपत्रक काढून गुरुवारी म्हणजे आज रात्रीपासून राज्यात कडक लॉकडाऊन लागू होणार असल्याची माहिती दिलीय. त्यासाठी कठोर नियमावलीही तयार करण्यात आलीय. यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक आणि खासगी प्रवासी वाहतुकीबद्दल कडक नियम लागू करण्यात आले आहेत. त्यात आता एसटी महामंडळासाठी एक नियमावली परिवहन […]

ताज्याघडामोडी

ऑक्स‍िजनचा पुरवठा सुरळीत ठेवा अप्पर जिल्हाधिकारी  संजीव जाधव यांच्या सूचना

ऑक्स‍िजनचा पुरवठा सुरळीत ठेवा अप्पर जिल्हाधिकारी  संजीव जाधव यांच्या सूचना पंढरपूर, दि. २२ :- जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना बाधितांना  तात्काळ उपचार मिळावेत यासाठी शासकीय रुग्णालयासह खाजगी रुग्णांलयात डेडीकेटेड  कोविड हॉस्पिटल व डेडिकेटेड कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले  आहेत. या रुग्णालयांना ऑक्सिजनची कमतरता भासू यासाठी  वितराकांनी पुरवठा सुरळीत राहील याची […]

ताज्याघडामोडी

तुमच्या पाया पडतो,हात जोडतो आता तरी मदत करा !

राज्यातील रोज वाढणारी कोरोना बाधितांची संख्या,ऑक्सिजन अभावी तडफडून मरत असलेले रुग्ण,रेमिडिसीवीर चा तुडवडा आणि केंद्राचे असहकार्य यामुळे राज्यातील परिस्थिती आता हाताबाहेर चालली असल्याचे दिसून येत असुन गेल्या वर्षभरापासून अतिशय धैर्याने परिस्थिती हाताळणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आता केंद्राला आर्त विनवणी केली असून तुमच्या पाया पडतो,हात जोडतो पण कबूल केल्याप्रमाणे २६ हजार रेमिडीसीवर इंजेक्शन तातडीने द्या […]

ताज्याघडामोडी

भारताचा एका दिवसात कोरोना रुग्ण वाढीचा जागतिक विक्रम 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत जगभरातील सर्वाधिक रुग्ण एकट्या भारतात आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णसंख्येने जगभरातील सर्व रेकॉर्ड ब्रेक करत आज ३ लाखाहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात देशात ३ लाख १४ हजार ८३५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून २०१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १ […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गृहमंत्र्यांच्या नावाने पाच लाखांची मागणी करणाऱ्या पीआयची चौकशी

पुणे:कारवाई टाळण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे पोलिस निरिक्षक संतोष गिरीगोसावी यांची चौकशी उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांनी सुरु केली आहे. बारामतीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या संदर्भतील चौकशी निपक्षपातीपणे व्हावी या साठी विशेष पोलिस महानिरिक्षकांनी मिलिंद मोहिते यांना बार्शी येथे पाठवले होते. त्या संदर्भात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

रुग्ण दगावल्याने नातेवाईकांंकडून डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची तोडफोड

पुण्यातील कोंढवा परिसरातील प्राईम हॉस्पिटलमध्ये आणलेला रुग्ण दगावल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची तोडफोड केली. मंगळवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. कोंढवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी पंधरा ते वीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डॉक्टर सिद्धांत उदयकुमार तोतला (वय 25) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेबारा […]

ताज्याघडामोडी

राज्यातील ‘या’ भागात पुढील चार दिवस पावसाची शक्यता!

मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात 24 एप्रिल रोजी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे शहरात सध्या उन्हाचा कडाका कमी झाला असला तरी रात्रीच्या तापमानात वाढ झाली आहे. दरम्यान, यंदा पाऊस समाधानकारक होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार आहेत. येणारा पावसाळा देशभरात समाधानकारक असेल, असा अंदाज […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

35 हजारात remdesivir चे इंजेक्शन, धक्कादायक प्रकार समोर

नालासोपारा, 20 एप्रिल : कोरोनाच्या महामारीत रेमडेसीवीरची मागणी वाढल्याने त्याचा काळाबाजार करून रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक करून लुटारू सक्रीय झाले होते. नालासोपारा येथील महिलेने दिलेल्या माहितीमुळे रेमडेसीवीरचा काळाबाजार उजेडात आला आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून एका त्रिकुटाला अटक करून 3 इंजेक्शन व 3 मोटारसायकल जप्त केल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपूर्वी धानीव बाग येथील […]