ताज्याघडामोडी

आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून मंगळवेढा तालुक्यात २१ विकास सोसायटी संस्थांना मंजुरी

कोणतेही सिबिल न लागता, कोणतीही पत न पाहता सहकार क्षेत्रामध्ये अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे एकमेव साधन म्हणून गावोगावच्या विविध कार्यकारी सोसायटी कडे पाहिले जाते.मंगळवेढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांना कर्ज पुरवठ्यासाठी अडचणी येत होत्या अनेक शेतकरी माझ्याकडे येऊन गाऱ्हाणे घालत होते त्यामुळे सहकाराचा पाया भक्कम करण्याच्या उद्देशाने मंगळवेढा तालुक्यामध्ये २१ नवीन विविध कार्यकारी सोसायट्या स्थापन […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजप नेत्याच्या मुलीची आत्महत्या, विनयभंगाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल

उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारी चांगलीच वाढली आहे. खून, बलात्कार, दरोडा, विनयभंग अशा घटना सारख्या समोर येत असतात. आता अशीच एक धक्कादायक घटना रामपूरमधून समोर आली आहे. एका भाजप नेत्याच्या आठवीत शिकणाऱ्या मुलीने विनयभंगाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे. भाजप महिला मोर्चाच्या नेत्याच्या मुलीने मंगळवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही मुलगी आठवीत शिकत होती. […]

ताज्याघडामोडी

अभ्यासावरुन आई आणि मुलीचं वाजलं; भांडणाचा शेवट भयानक, दोघींनी गमावला जीव

आजकाल पालक आपल्या मुलांवर अभ्यासासाठी खूप दबाव टाकतात. आपल्या मुलांनी अभ्यास करून मोठं व्हावं, असं त्यांना वाटतं. मात्र, दुसरीकडे मुलं देखील कधीकधी रागाच्या भरात धक्कादायक पाऊल उचलतात. पालकांनी सांगितलेल्या गोष्टींवर विचार करण्याऐवजी ते नाराज होतात आणि नको ते पाऊल उचलतात. पश्चिम बंगालमधील हावडा येथे अशीच एक घटना घडली आहे. यात हायस्कूलच्या परीक्षा सुरू होण्याच्या दोन […]

ताज्याघडामोडी

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, बारावी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना TET अनिवार्य

महाविद्यालयीन शिक्षण व्यावस्थेत अधिक सुधार करण्यासाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी आता टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा/ TET) परीक्षा उतिर्ण होणं अनिवार्य करम्यात आलेय. 2024-25 या शैक्षणिक वर्षांपासून याची अंमलबजावनी करण्यात येणार आहे. याआधी आठवीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटी अनिवार्य होतं. सुरुवातीला हा निर्णय फक्त केंद्रीय स्तरावर लागू करण्यात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नी देवदर्शनाला जाताच पतीने विष पाजून अख्खं कुटुंब संपवलं, मोलकरणीने खिडकीतून दृश्य पाहून हादरली

उत्तर प्रदेशातील आग्रा येथे एका व्यक्तीने आपली आई आणि 12 वर्षाच्या मुलाची विष पाजून हत्या केली. यानंतर त्याने आत्महत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. तरुण चौहान असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याची पत्नी राजस्थानच्या सिकर येथील खातू श्यामजी मंदिरात गेली होती. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर ती सध्या परतीच्या […]

ताज्याघडामोडी

मोबाईल चोरल्याचा संशय, भुर्जी विकणाऱ्या तरुणाकडून महिलेची हत्या

पुण्यात सलग चौथ्या दिवशी हत्येचा थरार दिसून आला आहे. हा सर्व थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेनं पुण्यात खळबळ उडाली आहे. मोबाईल चोरल्याच्या संशयावरुन दोन तरुणांनी एका महिलेची भररस्त्यात दिवसाढवळ्या हत्या केली आहे. दोन दिवसांपूर्वीच एका व्यक्तीने परिचय असलेल्या एका तरुणावर गोळीबार केला आणि स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. ज्या तरुणावर गोळीबार झाला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तिचा फोन आला म्हणून भेटायला गेला अन् गायब झाला, नंतर शेतात जे दिसलं ते पाहून सगळेच हादरले

बिहारच्या पूर्णिया जिल्ह्यात अनैतिक संबंधांच्या कारणावरून जगेश्वर शर्मा नावाच्या व्यक्तीची गळा चिरून अत्यंत भीषण पद्धतीने हत्या करण्यात आली आहे. ही घटना बायसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या मीनापूर पंचायतीतल्या फूलबासा गावातली आहे. मृताचं शिर मक्याच्या शेतात पुरलेलं आढळलं, तर त्याचं धड अद्याप सापडलेलंच नाही. त्याच शेतात त्या व्यक्तीच्या चपला आणि टोपी सापडली आहे. श्वानपथकाची मदत घेऊन बायसी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

आई फोन घेईना, घरी येऊन पाहिलं तर दाराला कुलूप, चपलेवरुन संशय, दरवाजा उघडताच लेक हादरला

घटस्फोटाला आईच जबाबदार असल्याच्या कारणावरून मुलाने आईचा गळा चिरून निर्घृण खून केल्याचा प्रकार खडकी परिसरात घडला. गुंफाबाई शंकर पवार (वय ५५, रा. श्रीरामपूर, नगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव असून, ज्ञानेश्वर शंकर पवार (वय २९, रा. खडकी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खडकी पोलिसांनी आरोपी मुलाला अवघ्या काही तासांत शिर्डी परिसरातून ताब्यात घेतले. हा […]

ताज्याघडामोडी

अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या फलकावर शाईफेक

बारामती तालुक्यातील काऱ्हाटी येथे उभारण्यात आलेल्या फ्लेक्स फलकावर अज्ञात व्यक्तीनं शाईफेक केल्याची घटना घडली आहे. त्यामुळं बारामतीमध्ये वातावरण तापलंय. अजित पवार यांच्या काऱ्हाटी येथील कार्यकर्त्यांनी आपल्या शेती फार्मवर सुनेत्रा पवार यांचा फ्लेक्स लावला होता. या फ्लेक्सवर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीनं शाईफेक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार फलकावर शाई फेकल्याचं लक्षात येताच गावकऱ्यांनी संबंधित फलक […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

दोघात उधारीचा वाद; भेटायला बोलवून तरुणाचा काढला काटा, रागात अल्पवयीन मुलाचं कृत्य

उधार घेतलेले ३ हजार ५०० रूपये परत न केल्याने एका अल्पवयीन मुलाने ३५ वर्षीय तरूणाची दगडाने ठेचून हत्या केली. ही घटना शहरातील गुरूनानक नगरातील आमदार संदीप धुर्वे यांच्या घराशेजारी ९ फेब्रुवारीला रा़त्रीच्या सुमारास घडली. सचीन सुखदेव माटे (३५) रा. गुरूनानक नगर, यवतमाळ असे मृत तरूणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गुरूनानक नगरात सचीन माटे हा […]