ताज्याघडामोडी

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, बारावी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना TET अनिवार्य

महाविद्यालयीन शिक्षण व्यावस्थेत अधिक सुधार करण्यासाठी केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी आता टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा/ TET) परीक्षा उतिर्ण होणं अनिवार्य करम्यात आलेय.

2024-25 या शैक्षणिक वर्षांपासून याची अंमलबजावनी करण्यात येणार आहे. याआधी आठवीपर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांना टीईटी अनिवार्य होतं. सुरुवातीला हा निर्णय फक्त केंद्रीय स्तरावर लागू करण्यात येणार आहे. त्याला राज्यही आपल्या व्यवस्थेत सामील करतील. 

राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेनं सोमवारी शिक्षक पात्रता परीक्षेची घोषणा केली. राष्ट्रीय संमेलनात याबाबतची घो,णा करण्यात आली. राष्ट्रीय शिक्षण नीती 2020 (एनईपी) वर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद आयोजित केली. NEP च्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सुधारणांवर चर्चा करण्यासाठी यावेळी विचारमंथन करण्यात आले. शिक्षक पात्रता चाचणी (TET) ची घोषणा करण्यात आली. सीबीएसईसोबत याबाबत हा निर्णय घेण्यात आलाय. सध्या केंद्रीय स्तरावर सुरुवात होणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्याने प्रत्येक राज्यात अमंलबजावणी होईल.

शिक्षक पात्रता परीक्षेबाबत (टीईटी) सोमवारी झालेल्या राष्ट्रीय परिषदेत राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने (एनसीटीई) घोषणा केली आहे. यावेळी परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक योगेश साह म्हणाले की, “गुणांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी शिक्षण व्यवस्थेचा भर विद्यार्थ्यांच्या विकासावर आणि मूल्यांवर केंद्रित झाला पाहिजे. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा त्यांना शिकवणाऱ्या शिक्षकांनाही समज असेल.” यावेळी एनसीटीईचे सचिव केसांग वाय शेर्पा यांनी शाळांमध्ये इयत्ता 9 वी ते 12 वी पर्यंत शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी पुढील शैक्षणिक सत्रापासून टीईटी आयोजित करण्याबाबत माहिती दिली. त्या दिशेने तयारी वेगाने सुरू असल्याचेही सांगितले. 

CBSE चेअरपर्सन, IAS निधी छिब्बर म्हणाल्या की, “शिक्षकांची सक्षमता वर्गात एक प्रभावी वातावरण निर्माण करते. त्यामुळे शिक्षकाची योग्यता आणि कार्यक्षमता समजून घेण्यासाठी शिक्षक पात्रता परीक्षा (TET ) खूप महत्त्वाची भूमिका बजावते. CBSE बऱ्याच काळापासून TET परीक्षा आयोजित करत आहे, त्यामुळे त्यांना विस्तृत अनुभव आहे. आम्ही TET डेटा NCTE सोबत सामायिक करू आणि भविष्यातील योजना एकत्रितपणे राबवू”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *