ताज्याघडामोडी

दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची बच्चू कडू यांची सूचना

मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता आहे. शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी बैठकीत मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्या अशा सूचना केल्या आहेत. 10 आणि 12 वी च्या मार्च महिन्यात होणाऱ्या परीक्षा एक महिना पुढे ढकलावी, अशी सूचना राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शिक्षण उपसंचालकांसोबत झालेल्या ऑनलाइन […]

ताज्याघडामोडी

३० कोटी रुपयांची संपत्ती दान करून कुटुंबाने दीक्षा घेतली

छत्तीसगडमधील डाकलिया कुटुंब हे एक नामांकित कुटुंब आहे. ३० कोटी रुपयांची संपत्ती दान करून औषधाचा व्यापार करणाऱ्या या कुटुंबाने दीक्षा घेतली आहे. हे कुटुंब आता आरामदायी जीवनाचा त्याग करून संयमाच्या मार्गावर निघाले आहे. गुरुवारी डाकलिया कुटुंबातील पाच सदस्यांनी एकत्र दीक्षा घेतली. एका सदस्याला प्रकृती अस्वास्थ्यामुळे दीक्षा घेता आली नाही. ते ५ फेब्रुवारीलादी दीक्षा घेतील. कुटुंबप्रमुख […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तथाकथित आध्यात्मिक गुरु भैयू महाराज आत्महत्या प्रकरणी तिघांना शिक्षा

दिवंगत अध्यात्मिक गुरु संत भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी आज इंदौर येथील सेशन्स कोर्टात अंतिम सुनावणी झाली. कोर्टाने या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले भय्यू महाराजांचे दोन सेवक विनायक आणि ड्रायव्हर शरद यांना दोषी ठरवलं आहे. या दोघांसोबतच पलक नावाच्या महिलेला देखील दोषी ठरवण्यात आलं आहे. या पलकने भय्यू महाराजांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत अश्लील व्हिडीओ बनवले होते, […]

ताज्याघडामोडी

राज्यातील ७८०० शिक्षक बोगस?

राज्यातील ७८०० शिक्षक बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या ३८०० उमेदवारांना पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचे पुणे सायबर पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२०मध्ये घेतलेल्या टीईटी परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून २०१८मध्ये परीक्षेत मोठ्या प्रमाणात अपात्र परीक्षार्थींकडून पैसे घेऊन पात्र ठरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्य […]

ताज्याघडामोडी

सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभेच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द, ठाकरे सरकारला दणका

सर्वोच्च न्यायालयाकडून विधानसभेच्या १२ आमदारांचं निलंबन रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत या १२ आमदारांचे एक वर्षाचे निलंबन रद्द करण्याचा महाराष्ट्राच्या विधानसभेचा निर्णय जाहीर करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल देताना राज्य सरकारचा हा असंविधानिक आणि मनमानी कारभार असल्याची नोंद निकालाच्या आदेशात केली आहे. तालिका […]

ताज्याघडामोडी

उद्योग क्षेत्रातील कामगारांना कोविड लशीची दुसरी मात्रा तातडीने द्या

जिल्ह्यातील औद्योगिक आस्थापनांमधील अधिकारी, कामगारवर्गाला कोविड लशीची दुसरी मात्रा तातडीने देऊन त्यांचे लसीकरण पूर्ण करावे अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज उद्योगांच्या प्रतिनिधींसमवेत झालेल्या आभासी (ऑनलाईन) पद्धतीने झालेल्या बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातून झालेल्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे, उद्योग विभागाचे सह संचालक सदाशिव सुरवसे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी संजय देशमुख, […]

ताज्याघडामोडी

महाराष्ट्रात आता किराणा दुकानांमध्येही वाईन मिळणार, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्व सुपर मार्केटमध्ये वाईन खरेदी करता येणार आहे. फक्त त्यासाठी सुपर माक्रेटची जागा 1 हजार स्क्वेवर फुट असायला हवं, असा निकष राज्य मंत्रिमंडळाकडून ठेवण्यात आला आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत माहिती दिली. “दुकानांना वाईन विकण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा फळ उत्पादनावर […]

ताज्याघडामोडी

धनंजय मुंडेंना मोठा धक्का; काँग्रेसने भाजपसोबत केला घरोबा

राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांना केज नगरपंचायतीमध्ये मोठा धक्का बसला आहे. काँग्रेस आणि भाजप पुरस्कृत जनविकास आघाडी एकत्र आली असून सत्ता स्थापन केली आहे. राष्ट्रवादीला दूर ठेवण्यासाठी काँग्रेसचा स्थानिक जनविकास आघाडीला पाठिंबा मिळाल्यामुळे हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. केज नगरपंचायतीसाठी खासदार रजनीताई पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आणि जनविकास आघडी एकत्र […]

ताज्याघडामोडी

अजित पवारांचा काँग्रेसला दणका, 28 नगरसेवक राष्ट्रवादीत

मालेगाव महानगरपालिकेतील काँग्रेसच्या सर्व 28 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. मालेगावमधील काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी आमदार रशीद शेख आणि महापौर ताहिरा शेख यांनीही पक्षाला सोठचिठ्ठी दिलीय. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसलाय. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मालेगावात मोठा हादरा बसला आहे. मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या पक्षाच्या कार्यक्रमात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 7 कोटींच्या बनावट नोटा जप्त, रॅकेटचा पदार्फाश

मुंबईतील दहिसर भागात बनावट नोटा तयार करणाऱ्या रॅकेटचा मुंबई क्राईम ब्रांचने पर्दाफाश केला आहे. तब्बल 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहे. मुंबईमध्ये आतापर्यंतही ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबईतील दहिसर परिसरात क्राईम ब्रांचने धडक कारवाई करत एका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. 7 कोटी […]