ताज्याघडामोडी

राज्यातील ७८०० शिक्षक बोगस?

राज्यातील ७८०० शिक्षक बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या ३८०० उमेदवारांना पैसे घेऊन उत्तीर्ण केल्याचे पुणे सायबर पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२०मध्ये घेतलेल्या टीईटी परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला असून २०१८मध्ये परीक्षेत मोठ्या प्रमाणात अपात्र परीक्षार्थींकडून पैसे घेऊन पात्र ठरवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

राज्य परीक्षा परिषदेकडून आलेला मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांनी केली असता, ५० ते ६० हजार रूपये घेऊन अपात्र उमेदवारांना पात्र केल्याचे उघड झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *