ताज्याघडामोडी

३० कोटी रुपयांची संपत्ती दान करून कुटुंबाने दीक्षा घेतली

छत्तीसगडमधील डाकलिया कुटुंब हे एक नामांकित कुटुंब आहे. ३० कोटी रुपयांची संपत्ती दान करून औषधाचा व्यापार करणाऱ्या या कुटुंबाने दीक्षा घेतली आहे.

हे कुटुंब आता आरामदायी जीवनाचा त्याग करून संयमाच्या मार्गावर निघाले आहे. गुरुवारी डाकलिया कुटुंबातील पाच सदस्यांनी एकत्र दीक्षा घेतली. एका सदस्याला प्रकृती अस्वास्थ्यामुळे दीक्षा घेता आली नाही. ते ५ फेब्रुवारीलादी दीक्षा घेतील.

कुटुंबप्रमुख मुमुक्षू भूपेंद्र डाकलिया म्हणाले, २०११ मध्ये रायपूरला कैवल्यधाम येथे आमचे कुटुंब गेले होते. तेव्हा सर्वात लहान हर्षित याच्या मनात दीक्षा घेण्याची भावना जागृत झाली. तो तेव्हा ६ वर्षांचा होता. हर्षितने गुरूंच्या साक्षीने अगदी हसत-हसत केशदान केले.

यानंतर चारही मुलांत हळूहळू दीक्षा घेण्याची भावना जागृत झाली. कैवल्यधामहून परतल्यानंतर काही दिवसांनी सर्वच अपत्यांनी ही इच्छा बोलून दाखवली. पण, तेव्हा मुलांचे वय खूपच कमी होते. मी थोडी वाट पाहिली. आता दहा वर्षांनंतर सर्वच जण परिपक्व आहेत.

तरीही त्यांच्या मनातील भावना बदलली नाही. दीक्षा घेण्याची भावना तशीच होती. म्हणूनच मी पण यासाठी संमती दर्शवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *