गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तथाकथित आध्यात्मिक गुरु भैयू महाराज आत्महत्या प्रकरणी तिघांना शिक्षा

दिवंगत अध्यात्मिक गुरु संत भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी आज इंदौर येथील सेशन्स कोर्टात अंतिम सुनावणी झाली.

कोर्टाने या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले भय्यू महाराजांचे दोन सेवक विनायक आणि ड्रायव्हर शरद यांना दोषी ठरवलं आहे. या दोघांसोबतच पलक नावाच्या महिलेला देखील दोषी ठरवण्यात आलं आहे. या पलकने भय्यू महाराजांना प्रेमाच्या जाळ्यात ओढत अश्लील व्हिडीओ बनवले होते, अशी देखील माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. अखेर तीनही आरोपींना कोर्टाने दोषी ठरवलं आहे.

कोर्टाने या तीनही दोषींना सहा वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. कारण या तिघांनी भय्यू महाराजांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप कोर्टात सिद्ध झाला आहे. या प्रकरणी इंदूरच्या सेशन्स कोर्टात जवळपास साडेतीन वर्षांपासून सुनावणी सुरु होती. अखेर या प्रकरणी सेवादार शरद देशमुख, विनायक दुधाले आणि पलक पुराणिक यांनी पैशांसाठी भय्यू महाराजांना मानिसिकरित्या त्रास दिल्याचं उघड झालं.

आरोपी पैशांसाठी भय्यू महाराजांना ब्लॅकमेल करायचे हे कोर्टात सिद्ध झालं आहे. ज्या सेवकांवर भय्यू महाराजांचा विश्वास होता, ज्यांच्यावर आपल्या आश्रम, कुटुंबाची जबाबदारी सोपवली होती त्याच सेवकांनी विश्वासघात केला. त्यानंतर पैशांसाठी महाराजांना आत्महत्येस प्रवृत्त केलं, असं कोर्टात सिद्ध झालं.

जाणून घ्या सरकार काय पाऊल उचलणार?

याप्रकरणी 19 जानेवारीला सुनावणी झाली होती. ही सुनावणी जवळपास साडेपाच तास सुरु होती. त्यावेळी या प्रकरणाचा निकाल 28 जानेवारीला सुनावला जाईल, असं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर आज कोर्टात तीनही आरोपींना सहा वर्ष कारवासाची दंडात्मक शिक्षा सुनावण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *