ताज्याघडामोडी

महाराष्ट्रात आता किराणा दुकानांमध्येही वाईन मिळणार, राज्य मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सर्व सुपर मार्केटमध्ये वाईन खरेदी करता येणार आहे. फक्त त्यासाठी सुपर माक्रेटची जागा 1 हजार स्क्वेवर फुट असायला हवं, असा निकष राज्य मंत्रिमंडळाकडून ठेवण्यात आला आहे.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत माहिती दिली. “दुकानांना वाईन विकण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा फळ उत्पादनावर वायनरीज चालते. त्यांच्या उत्पादनांना चालना देण्यासाठी नवीन पॉलिसी ठरविण्यात आली आहे.

एक हजार फुटापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या दुकानांना वाईन विकण्याची परवानगी मिळणार नाही. जे सुपर मार्केट आहे त्यांना एक सो-केश निर्माण करुन वाईन विकण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे”, अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी माध्यमांना दिली.

दरम्यान, सुपर शॉपीमध्ये वाईन उपल्बध करुन देण्याबाबतचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. राज्याचा महसूल वाढविण्याचा दृष्टीकोनातून हा निर्णय घेतला गेल्याची चर्चा आहे.

कोरोना संकटामुळे राज्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्यामुळे या संकट काळात राज्याचा महसूल वाढावा या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे या निर्णयाने राज्यातील शेतकऱ्यांना सर्वात मोठा लाभ मिळणार असल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जातोय. जेव्हा वाईन तयार होईल त्यामधून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चालना मिळेल, असा दावा करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *