ताज्याघडामोडी

पंढरपुरात वडाच्या झाडाचे झाले पुजन

पंढरपुरात वडाच्या झाडाचे झाले पुजन पंढरपूर – वडाच्या झाडाला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असे महत्व आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. अशा वटवृक्षाचे झाड […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

कोरोना ड्युटी लावली म्हणून मुख्याध्यपकास मारहाण

शिक्षकांना देण्यात येणारी इलेक्शन ड्युटी आणि कोरोना ड्युटी हि सातत्याने विविध कारणामुळे वादात सापडली असल्याचे दिसून आले आहे.शारीरिक आजार अथवा इतर कारणामुळे अनेक शिक्षकांचा इलेक्शन ड्युटी घेण्यास विरोध असल्याचे दिसून आले तसाच प्रकार गेल्या दीड वर्षांपासून राज्यात शिक्षकांना कोरोना उपायोजना बाबत विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत.अशातूनच वादाचे प्रसंग निर्माण होत आहेत.असाच प्रकार सोलापुरात घडला […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ईडीने जप्त केली उद्योजक अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता

पुणे – अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अविनाश भोसलेंची ईडीकडून चौकशी सुरू होती. त्यांच्यावर मनी लॉड्रींग प्रकरणी गुन्हाही नोंद करण्यात आला होता. अविनाश भोसलेंच्या पुणे आणि मुंबईतील मालमत्तांवर ईडीने छापेही टाकले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम […]

ताज्याघडामोडी

मराठा मूक आंदोलन पुढे ढकलले; सरकारला एक महिन्याची डेडलाइन

नाशिक – मराठा आरक्षणासाठी पुणे ते विधानभवन लॉंगमार्च काढावा, अशी आमची इच्छा नाही. सरकारने एक महिन्यात आमच्या मागण्या मार्गी लावाव्यात. आमची आंदोलने थांबली नाहीत. बैठकाही सुरूच राहणार आहेत. मात्र, सरकार 21 दिवसांत प्रश्‍न मार्गी लावत असल्याने एक महिना मराठा मूक आंदोलन पुढे ढकलत आहोत, असे जाहीर करतानाच या महिनाभरात आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

उपराजधानी हादरली; पत्नी, मुलं, सासू व मेव्हणीची केली हत्या, नंतर स्वत: केले असे काही

नागपूर – शहरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हत्येनंतर आरोपीने सुद्धा आत्महत्या केली . या घटनेमुळे शहारात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत. अलोक माथुरकर असे आरोपीचे नाव असून हा प्रकार शहरातील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत […]

ताज्याघडामोडी

महाग पेट्रोलपासून मिळणार दिलासा, १०० रुपये नाही तर इतके स्वस्त मिळणार पेट्रोल

नवी दिल्ली: पेट्रोलच्या वाढत्या किंमतींच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलच्या जागी एक वेगळे आणि स्वस्त इंधन उपयोगात आणण्याचा विचार सध्या केला जात आहे. हे इंधन म्हणजे इथेनॉल. सरकार येत्या 8 ते 10 दिवसांमध्ये फ्लेक्स फ्यूएल इंजिनबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. हे इंजिन ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी अनिवार्य केले जाणार आहे.फ्लेक्स फ्यूएल म्हणजे फ्लेक्सिबल फ्यूएल, म्हणजे असे इंधन जे पेट्रोलची […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

दहशत पसरवून खंडणीवसुली, स्वयंघोषित समाजसेवकासह भावाला बेड्या

पिंपरी चिंचवड : स्वयंघोषित समाजसेवकच खंडणीखोर निघाल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. त्याचे सहकारी जबरी चोरी करणारे गुन्हेगार असल्याचे समोर आल्यावर शिरुर पोलिसांनी धडक कारवाई करत त्यांना बेड्या ठोकल्या. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे ही घटना घडल्याची माहिती आहे. अमोल उर्फ मिथुन आनंदा चौगुले असं या स्वयंघोषित समाजसेवकाचं नाव आहे. सोशल मीडियावर […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

प्रियकराच्या आत्महत्येनंतर 15 दिवसाने तिनेही गळफास घेत केली आत्महत्या

औरंगाबाद | येथील एकता नगरमध्ये राहणाऱ्या एका 17 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला आहे. पंधरा दिवसापूर्वी विवाह ठरलेल्या मुलाने आत्महत्या केल्याच्या तणावातून हा प्रकार झाल्याचे समोर आले आहे.हाती आलेल्या माहिती नुसार, खुशी रमेश कलवले (वय १७, रा.गायकवाड हौसिंग सोसायटी, एकता नगर, जटवाडा रोड ) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. खुशी पदवीच्या […]

ताज्याघडामोडी

ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा; वडेट्टीवारांचं मोठं विधान

नागपूर: ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मोठं विधान केलं आहे. आम्ही मंत्री असलो तरी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. तसेच निवडणुका न घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. ही चर्चा सकारात्मक होती, असा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पोलिसांच्या रखवालीतून कैद्याचे पलायन; पोलीस उपनिरीक्षकासह पाच जण निलंबीत

अभिवचन रजा (तातडीची रजा) कालावधीत कैद्याने पोलिसांच्या रखवालीतून पलायन केल्याप्रकरणी पुण्यातील कोर्ट कंपनीच्या पोलीस उपनिरीक्षकासह पाच जणांना निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. खात्याअंतर्गत केलेल्या प्राथमिक विभागीय चौकशीत दोषी आढळल्यानंतर संबंधिताविरूद्ध कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन प्रल्हाद निबांळकर, पोलिस हवालदार बाळु रामचंद्र मुरकुटे, शरद नाथा मोकाते, महावीर लक्ष्मण सामसे, […]