ताज्याघडामोडी

पंढरपुरात वडाच्या झाडाचे झाले पुजन

पंढरपुरात वडाच्या झाडाचे झाले पुजन
पंढरपूर –
वडाच्या झाडाला हिंदू संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असे महत्व आहे. हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस “वटपौर्णिमा” म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. अशा वटवृक्षाचे झाड पंढरपुरातील येळे वस्ती येथील सौ.सिमाताई प्रशांतराव परिचारक संस्थापिका राजयोगिनी मागास महिला चॅरिटेबल ट्रस्ट व एकवीरा महिला ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त लावण्यात आलेले आहे. सदरचे झाड लावल्यानंतर 1 वर्षानंतर त्या झाडाची विधीवत पुजा करण्याची परंपरा आहे. त्याप्रमाणे आज मंगळवार दि.22 जून रोजी या झाडाची पुजा श्री अभिजीत व सौ.पल्लवी रजपूत यांच्याहस्ते करण्यात आली.
यावेळी शैलजा सलगर, उज्वला वडगोवे, चंदना येळे, लक्ष्मी दिवटे, सुनिता पवार, पल्लवी ठाकरू आदि उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिता तोंडे यांनी केले.
सदरच्या वटवृक्षाच्या झाडामुळे 24 तास नैसर्गिकरित्या ऑक्सिजनची निर्मिती होत असते याचा आता या भागातील नागरिकांना चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे. यामुळे सदरचे वृक्ष लावणाऱ्या माजी नगरसेविका कमल तोंडे यांचे अनेकांनी आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *