गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

दहशत पसरवून खंडणीवसुली, स्वयंघोषित समाजसेवकासह भावाला बेड्या

पिंपरी चिंचवड : स्वयंघोषित समाजसेवकच खंडणीखोर निघाल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. त्याचे सहकारी जबरी चोरी करणारे गुन्हेगार असल्याचे समोर आल्यावर शिरुर पोलिसांनी धडक कारवाई करत त्यांना बेड्या ठोकल्या. पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे ही घटना घडल्याची माहिती आहे.

अमोल उर्फ मिथुन आनंदा चौगुले असं या स्वयंघोषित समाजसेवकाचं नाव आहे. सोशल मीडियावर चुकीच्या व्हिडीओ क्लीपचा तो खुबीने वापर करत असे. समाजातील सर्वसामान्य नागरिक, व्यावसायिक यांच्यामध्ये भीती आणि दहशतीचे वार्तावरण निर्माण करुन अमोल उर्फ मिथुन आनंदा चौगुले आणि त्याचा सख्खा भाऊ पप्पू हे त्यांच्याकडून खंडणी वसूल करायचे.

स्वतःच्या घरात हातभट्टीची दारु तयार करून विक्री करत असताना पोलिसांनी त्यांना अटक केली.

चितळेंच्या बदनामीची धमकी देत शिक्षिकेची खंडणीची मागणी

दरम्यान, पुण्यातील चितळे दुधात काळा पदार्थ आढळल्याचं सांगून, बदनामीची धमकी देऊन 20 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वीच समोर आला होता. या प्रकरणी पोलिसांनी एका शिक्षिकेसह चार जणांना अटक केली आहे. तसेच बिबवेवाडी पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पूनम परदेशी ही महिला एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षिका आहे. तिच्या घरी येणाऱ्या दुधामध्ये काळ्या रंगाचा पदार्थ आढळून आला. त्यामुळे तिने दुधात भेसळ करण्यात आली असल्याचा तसेच दूध खराब असल्याचा ईमेल 2 जून रोजी दुग्ध व्यावसायिकाच्या ग्राहकाच्या तक्रार निवारण केंद्राकडे पाठवला. चितळे दूध डेअरीच्या प्रतिनिधींनी ही तक्रार नोंदवून घेतली. मात्र, त्यानंतर या तक्रारीच्या आधारे आरोपींनी संबंधितांना त्रास देण्यास सुरुवात केली. कधी फोन करून किंवा कधी प्रत्यक्ष भेटून आरोपी कंपनीच्या प्रतिनिधींना धमकावत होते, असा आरोप आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *