ताज्याघडामोडी

पंढरपुरातील स्वबळावर नगरसेवक होण्याचे स्वप्ने पाहणाऱ्या समाजसेवकांच्या अडचणी वाढल्या

स्वबळावर नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या व कुठलीही राजकीय बांधिलकी न मानता केवळ आपण आपल्या भागात केलेल्या जनसेवेचे बळावर नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या अनेक भावी नगरसेवकांना पंढरपुर सह राज्यातील सर्वच नगर पालिका निवडणुका एक सदस्यीय वार्ड रचनेनुसार होणार असल्याने मोठा दिलासा मिळाला होता.दोन ते अडीच हजार मतदार संख्येचे वार्ड तयार केले जातील अशी अपेक्षाही होती.बहुसदस्यीय प्रभाग […]

ताज्याघडामोडी

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना मिळणार 50 हजार

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून दिली जाणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. केंद्र सरकारने म्हटले आहे की, ही रक्कम राज्य सरकाराच्या वतीने दिली जणार जाणार आहे. केंद्र सरकारने न्यायालयात म्हटले, आतापर्यंत कोरोनामुळे जीव गमवावा लागलेल्या आणि भविष्यात जीवितहानी होणाऱ्यांच्या कुटुंबियांना ही मदत दिली जाणार आहे. […]

ताज्याघडामोडी

काळजी घ्या! राज्यात पुढील दोन दिवस सर्वत्र वादळी पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांचे नुकसान होणार

राज्यात पुढील दोन दिवस सर्वत्र वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाचा क्षेत्रांमुळे पाऊस लांबला आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती तयार होत आहे. याचा परिणाम म्हणून मुंबई, कोकण आणिविदर्भासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत पावसाचा जोर वाढणार आहे. […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

जामिनावर सुटताच तुफान गोळीबार, हत्येच्या आरोपातील तरुणाची निर्घृण हत्या

जळगाव : भुसावळ तालुक्यातील नशिराबाद खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या एका संशयित आरोपीची अज्ञात मारेकऱ्यांनी निर्घृणपणे हत्या केली आहे. जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे आज (मंगळवारी) सायंकाळी साडेसात राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली ही घटना घडली. या घटनेत हत्या झालेल्या तरुणाचे वडील देखील गंभीर जखमी झाले आहेत. जळगावातून दुचाकीने भुसावळला जात होते धम्मप्रिय मनोहर सुरळकर (वय 19) असे या घटनेतील मृत तरुणाचे […]

ताज्याघडामोडी

साईसंस्थानच्या अधिकाऱ्या सह इतर सहा जणांना अटक; जाणून काय आहे नेमकं प्रकरण?

शिर्डी येथील साईसंस्थानच्या अधिकाऱ्सासह इतर सहा जणांना आज पोलिसांनी अटक केली आहे. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडिया चॅनेलला पुरवून संस्थानाची बदनामी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. साईबाबा मंदिराचे संरक्षण अधिकारी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी फिर्याद दिली असून शिर्डी पोलीस ठाण्यात साईसंस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप, सीसीटीव्ही विभागाचे प्रमुख विनोद कोते, कर्मचारी चेतक सावळे, सचिन गव्हाणे, […]

ताज्याघडामोडी

1 ऑक्टोबरपासून डिजिटल पेमेंट पद्धतीत मोठे बदल; RBI हे नवे नियम लागू करणार

पुढील महिन्यापासून म्हणजेच 1 ऑक्टोबरपासून ऑटो डेबिट पेमेंट सिस्टीममध्ये  मोठा बदल होणार आहे. नवीन ऑटो डेबिट पेमेंट सिस्टम 1 ऑक्टोबरपासून लागू होण्याची शक्यता आहे. या नियमानुसार, पेटीएम-फोन पे सारख्या बँका आणि डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मला प्रत्येक वेळी हप्ता (ईएमआय हप्ता) किंवा बिलाचे पैसे कापण्यापूर्वी परवानगी घ्यावी लागेल. एकदा परवानगी दिल्यावर प्रत्येक वेळी पैसे आपोआप कापले जाऊ […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर कुर्डूवाडी रोड बनतोय मृत्यूचा सापळा

पंढरपूर-कुर्डुवाडी हा निकृष्ट दर्जाचा रोड झाले असून जिथे जिथे रोड खराब झाले आहेत हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवल्यानंतर व प्रत्येक गावातील काही जागरूक नागरिकान मधून रस्त्याची दुरवस्था झाली आहे त्यांनी आवाज उठवल्यानंतर व आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे तसेच केंद्रीय रस्ते विकास मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या आदेशानुसार रस्त्याचे काम जिथे जिथे रखडले अनेक जिथे रस्ते […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गुन्ह्याच्या तपासात मदतीसाठी स्विकारली 10 हजारांची लाच; ASIसह पोलीस नाईक ताब्यात

अपघात प्रकरणी दाखल गुन्ह्यांत तपासात मदत करण्यासाठी सहायक उपनिरीक्षकाने आरोपीकडे दहा हजार रूपयांची मागणी केली. तसेच ती लाच पोलीस नाईक कर्मचार्‍याच्या हस्ते घेत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पथकाने सापळा रचून त्याला रंगेहाथ पकडले.अभिरूची पोलीस चौकीसमोर मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. श्रीपती माणिक कोलते (वय 55, सहायक पोलीस उपनिरीक्षक) आणि शिवाजी बाळासाहेब जगताप (वय 34, पोलीस […]

ताज्याघडामोडी

आ.समाधान आवताडे यांच्या उद्योग-व्यवसाय विषयी राजकीय द्वेषापोटी टीकाटिप्पणी

आमदार समाधान आवताडे यांच्यावर टिका करणाऱ्याना कधिच मोठेपणा मिळणार नाही. असे मत मंगळवेढा नगरपालिका शिक्षण मंडळ सदस्य दिगंबर यादव यांनी  व्यक्त केले. केवळ वैयक्तिक प्रसिध्दसाठी ससेहोलपट चालू आहे ,असेही ते म्हणाले. मंगळवेढा येथे नुकतेच शेतकरी संघटनेचे आंदोलन झाले या आंदोलन मध्ये शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सचिन पाटील यांनी मोघमपणे कारखान्याच्या कर्जाविषयी आपली मुक्ताफळे उधळली त्यापेक्षा वस्तुस्थितीची […]

ताज्याघडामोडी

शिवसेना नेते अनिल परब यांचा किरीट सोमय्यांविरूद्ध 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनी अखेर भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात 100 कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे. आपल्यावरील आरोप मागे घेऊन माफी मागावी, अन्यथा 100 कोटींचा दावा दाखल करू, अशी नोटीस अनिल परब यांनी सोमय्यांना पाठवली होती. मात्र, 72 तासानंतरही सोमय्या यांनी माफी न मागितल्याने अखरे हा दावा दाखल करण्यात […]