कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना 50 हजार रुपये नुकसानभरपाई म्हणून दिली जाणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात दिली आहे.
केंद्र सरकारने म्हटले आहे की, ही रक्कम राज्य सरकाराच्या वतीने दिली जणार जाणार आहे. केंद्र सरकारने न्यायालयात म्हटले, आतापर्यंत कोरोनामुळे जीव गमवावा लागलेल्या आणि भविष्यात जीवितहानी होणाऱ्यांच्या कुटुंबियांना ही मदत दिली जाणार आहे.
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला माहिती देत सांगितलं की, एनडीएमएने कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना 50,000 रुपयांच्या भरपाईची रक्कमची शिफारस केली आहे. मदत कार्यात सहभागी असणाऱ्यांनाही भरपाईची ही रक्कम दिली जाईल. जर मृत्यू प्रमाणपत्रात मृत्यूचे कारण कोरोना असेल, तर मृतांच्या नातेवाईकांनाही मदत दिली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून कोरोनाग्रस्तांच्या कुटुंबीयांना भरपाई रक्कम मदत म्हणून दिली जाईल.
दरम्यान, कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी म्हणून सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर सुनावणी करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाला केंद्र सरकारने सांगितले होते की, मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना 4 लाखांची आर्थिक मदत करणे शक्य होणार नाही. न्यायालयानेही सरकारच्या या मुद्द्याला सहमती दर्शवली होती आणि एक मध्यम मार्ग शोधण्यास सांगितला होता.