ताज्याघडामोडी

पंढरपूर कुर्डूवाडी रोड बनतोय मृत्यूचा सापळा

पंढरपूर-कुर्डुवाडी हा निकृष्ट दर्जाचा रोड झाले असून जिथे जिथे रोड खराब झाले आहेत हे सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाज उठवल्यानंतर व प्रत्येक गावातील काही जागरूक नागरिकान मधून रस्त्याची दुरवस्था झाली आहे त्यांनी आवाज उठवल्यानंतर व आंदोलनाचा पवित्रा घेतल्यामुळे तसेच केंद्रीय रस्ते विकास मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या आदेशानुसार रस्त्याचे काम जिथे जिथे रखडले अनेक जिथे रस्ते खराब झाले आहेत तिथे परत रिवर्ककिंगचे म्हणजे रस्ता डागडुजीचे काम ही बांधकाम कंपनी करत असताना कुठल्याही प्रकारचं सेफ्टी केली नाही किंवा त्याची काळजी घेतली नाही.

दोन दिवसापासून खराब झालेला पँच काढत आहे.तिथे कॉंक्रिटचा जो मालाचा जो निघालेला जो साठा आहे तो तिथेच पडून ठेवला त्याची सफाई न करता तो तसाच ठेवला. आत्ताच्या मिळालेल्या माहितीनुसार आढिव गावातील राजेंद्र तानाजी नागटिळक ग्रामपंचायत कर्मचारी वय 26 विशाल बाळू जाधव वय 16 हे दोन युवक मोटरसायकलस्वार आढिव हुन पंढरपूर कडे जात असताना समोरून अनोळखी गाडीचा लाईटचा प्रकाश जोरात पडल्यामुळे त्यांना समोरील रस्त्याचे काम न दिसल्याने दोन्ही युवक खड्ड्यात पडून गंभीर अपघात घडला.

या अपघातामध्ये दोन्ही युवकांना पंढरपुरातील विठाई हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले खोदलेल्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला पन्नास किंवा शंभर मीटर अलीकडे कुठल्याही प्रकारचा सावधानतेचा बोर्ड लावण्यात आलेला नाही या पावसाळी हवामानामध्ये निकृष्ट कामामुळे रोड कुठे आहे हे समजत नाही अजून किती जणांचे बळी ही बांधकाम कंपनी घेईल सांगता येत नाही हे पाहून प्रशासनाला आतातरी जागे होऊन बंधकाम करणार्‍या कंपनीवर कारवाई करेल का त्याची सर्व नागरिकातून प्रशासनाला दोषी मानत आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *