ताज्याघडामोडी

साईसंस्थानच्या अधिकाऱ्या सह इतर सहा जणांना अटक; जाणून काय आहे नेमकं प्रकरण?

शिर्डी येथील साईसंस्थानच्या अधिकाऱ्सासह इतर सहा जणांना आज पोलिसांनी अटक केली आहे. मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडिया चॅनेलला पुरवून संस्थानाची बदनामी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

साईबाबा मंदिराचे संरक्षण अधिकारी पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी फिर्याद दिली असून शिर्डी पोलीस ठाण्यात साईसंस्थानचे प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप, सीसीटीव्ही विभागाचे प्रमुख विनोद कोते, कर्मचारी चेतक सावळे, सचिन गव्हाणे, सोसायटी कर्मचारी अजित जगताप व राहुल फुंदे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साई संस्थानचा कारभार पहाणाऱ्या तदर्थ समितीचे अध्यक्ष व जिल्हा प्रधान न्यायधिश हे एका सदस्यांसह काही दिवसांपूर्वी साईमंदिराची पहाणी करीत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मिडीयावर व्हायरल केल्याने हि कारवाई करण्यात आली आहे.

साईमंदिर सुरक्षा व्यवस्थेशी हि बाब निगडीत आहे, त्यामुळे याप्रकरणाची चौकशी व्हावी. अशी तक्रार माहीतीच्या अधिकारातील कार्यकर्ते संजय काळे यांनी तदर्थ समितीच्या अध्यक्षांकडे केल्याने पोलीस निरीक्षक गवळी यांनी चौकशी करून अहवाल तयार केला. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *