ताज्याघडामोडी

आ.समाधान आवताडे यांच्या उद्योग-व्यवसाय विषयी राजकीय द्वेषापोटी टीकाटिप्पणी

आमदार समाधान आवताडे यांच्यावर टिका करणाऱ्याना कधिच मोठेपणा मिळणार नाही. असे मत मंगळवेढा नगरपालिका शिक्षण मंडळ सदस्य दिगंबर यादव यांनी  व्यक्त केले. केवळ वैयक्तिक प्रसिध्दसाठी ससेहोलपट चालू आहे ,असेही ते म्हणाले.

मंगळवेढा येथे नुकतेच शेतकरी संघटनेचे आंदोलन झाले या आंदोलन मध्ये शेतकरी संघटनेचे पदाधिकारी सचिन पाटील यांनी मोघमपणे कारखान्याच्या कर्जाविषयी आपली मुक्ताफळे उधळली त्यापेक्षा वस्तुस्थितीची माहिती घेऊन त्यांनी बोलायला पाहिजे होते परंतु केवळ राजकीय द्वेषापोटी आकडेवारीचा चुकीचा खेळ केला माननीय आमदार समाधान दादा आवताडे यांच्या उद्योग-व्यवसाय विषयी राजकीय  द्वेषापोटी टीकाटिप्पणी केली.

उगीच राजकीय द्वेषापोटी आपण बिनबुडाचे आरोप करत सुटला शेतकऱ्यांच्या पोराला शोभत नाही आपण आपल्या भाषणातून आपण दामाजी कारखान्याच्या कारभार करत असताना सुत गिरणीची  उभारणी त्यातून झाली.असे बेताल बोलला परंतु खरी वस्तुस्थिती तुम्हास माहित नसलेचे दिसून येते.अशी प्रतिक्रिया शिक्षण मंडळ सदस्य दिगंबर यादव यांनी व्यक्त केली आहे.

सुत गिरानीची उभारणी प्रक्रिया सन 2010 पासून सुरु झाली तर सन 2015 ला सूतगिरणी पूर्णत्वास येऊन  उत्पादन सुरू झाले आणि दामाजी कारखान्याची निवडणूक सन 2016 मध्ये होऊन माननीय समाधान दादा आवताडे चेअरमन झालेले आहेत याची आपणास आठवण करून द्यावी असे वाटते त्यांचा कन्स्ट्रक्शन चा व्यवसाय हा वडीलोपार्जीत परंपरागत आहे.

आपल्या जन्मापूर्वी पासून हा व्यवसाय ते करत आहेत याची आपणास कल्पना नसल्याचे जाणवते या व्यवसायांमध्ये मतदारसंघातील जवळपास  दहा हजार लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे तसेच देशातील एक नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.

चंद्रभागेच्या तीरावर असणाऱ्या 65 एकर जागेत 16 दिवसात शासनाने दिलेल्या नियोजित वेळेत आद्यायवत पालखी तळ तयार करण्याचे काम आवताडे कन्स्ट्रक्शन कंपनीने केलेचे आपणास ज्ञात असेलच हे काम वेळेत व दर्जेदार केले बद्दल तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे सारख्या कर्तव्यदक्ष अधिकारी यांनी दादांचे कौतुक करून सत्कार केल्याचे आपणास आठवण असेलच अशा नावलौकिक प्राप्त उद्योगाबद्दल बोलताना भान व तारतम्य ठेवून बोलावे केवळ राजकीय स्टंटबाजी करून सवंग लोकप्रियतेसाठी असे बिनबुडाचे आरोप करणे बंद करावे. असे मत अशी प्रतिक्रिया शिक्षण मंडळ सदस्य दिगंबर यादव यांनी व्यक्त व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *