ताज्याघडामोडी

कामावर जाऊ नका, गेलात तर हातात बांगड्या भरून जा !

राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन धुमसत आहे. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण व्हावं, या मागणीसाठी कर्मचारी आग्रही असून अनेक ठिकाणी काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. अशातच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली एसटी आगारातील एक बसचालक चक्क हातात बांगड्या घालून कामावर हजर राहिल्याचं पाहायला मिळालं आहे. बसचालक अशोक वनवे हे रविवारी दुपारी ३ वाजता सुटणाऱ्या दापोली-ठाणे या […]

ताज्याघडामोडी

आयकर विभागाची महाराष्ट्रातील ‘या’ बँकेच्या 53.72 कोटींच्या व्यवहारांवर बंदी

प्राप्तिकर विभागाने महाराष्ट्रातील नागरी पत सहकारी बँकेत जमा केलेल्या 53 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या व्यवहारांवर बंदी घातलीय. आयकर विभागाने नुकत्याच टाकलेल्या छाप्यांमध्ये खाती उघडण्यात “मोठी अनियमितता” समोर आल्यानंतर बँकेवर ही कारवाई केलीय.केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) शनिवारी या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली. कोणत्या संस्थेवर छापा टाकला हे उघड केले नाही सीबीडीटीने सांगितले की, आयकर विभागाने […]

ताज्याघडामोडी

व्हिलन तुरुंगात जात नाही तोपर्यंत पिक्चर सुरूच राहणार; नवाब मलिक यांचा इशारा

सध्या जो खेळ सुरू आहे, तो काही मेरा नाम जोकर किंवा संगम या दोन चित्रपटांचे इंटरव्हल नाहीत. जोपर्यंत व्हिलन आत जात नाही, तोपर्यंत पिक्चर संपणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिला आहे. नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ड्रग्ज प्रकरणाचा आणखी भांडाफोड केला. हे काही मेरा नाम जोकर आणि संगम या दोन इंटरव्हलचे […]

ताज्याघडामोडी

येत्या 24 तासात महाराष्ट्रात मुसळधार; हवामान विभागाकडून 10 जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे येत्या 24 तासात महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र भारतीय किनारपट्टीपासून दूर जात असताना, त्यामुळे राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.  पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले. पुणे, नाशिक, […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

राजकीय पक्षाच्या पदाधिकारी असलेल्या महिलेची 36 वार करून हत्या

आरपीआयच्या महिला पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार संत कबीरनगर येथे ४ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री उघडकीस आला. या महिलेच्या अंगावर ३६ वार करण्यात आले असून अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संत कबीरनगर येथे राहणाऱ्या पूजा आंबेकर (२७) या संदीप आंबेकर नामक व्यक्तीसोबत वास्तव्यास होत्या. मध्यरात्री […]

ताज्याघडामोडी

९ तारखेपासून गुगल अकाउंटवर लॉग इन करण्याचा मार्ग बदलणार, काय आहे जाणून घ्या!

तुम्ही यापुढे फक्त एका क्लिकवर Google खात्यात लॉग इन करू शकणार नाही. तुमच्या Google खात्यात लॉग इन करण्यासाठी, तुम्हाला आता टू स्टेप व्हेरिफिकेशन प्रक्रियेतून जावे लागेल. 9 नोव्हेंबरपासून सर्वांसाठी ही प्रक्रिया सक्तीची केली जात आहे. कंपनीचे म्हणणे आहे की सुरक्षेचा विचार करून टू-स्टेप व्हेरिफिकेशन लागू करणे अत्यंत आवश्यक करण्यात आले आहे. कंपनीने या वर्षी ऑक्टोबरमध्ये […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ओढ्यात आढळले तीन मुलींचे मृतदेह; कुटुंबीयांना आहे ‘हा’ संशय

मिरज तालुक्यातील टाकळी येथे जुना मालगाव रस्ता परिसरातील मळलेवाडी ओढ्यात एक तरुणी, एक १६ वर्षीय मुलगी आणि एका बालिकेचा मृतदेह आढळला. शुक्रवारी दुपारी ही घटना उघडकीस आली. नंदिनी देवा काळे (वय १६), मेघा चव्हाण काळे (वय १८) आणि स्वप्नाली टवळ्या पवार (वय ६, सर्व रा. पारधी वस्ती, आंबेडकर नगर, टाकळी) अशी मृतांची नावे आहेत. या तिघांचाही […]

ताज्याघडामोडी

अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयात 10 जणांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू

अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयूममध्ये ऐन दिवाळीत भीषण आग लागली आहे. 10 जणांचा या आगीमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिली आहे. जेव्हा ही घटना घडली, तेव्हा 17 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत होते. त्यापैकी 10 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर सात जण भाजले असल्याचे भोसले यांनी सांगितले आहे. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! दिवाळीली माहेरी न पाठवल्याने पत्नीची आत्महत्या, धक्क्याने पतीनेही संपवले जीवन

दिवाळीला जाण्यासाठी पतीने विरोध केल्यानंतर पत्नीने घरातच छताला गळफास घेऊन आत्महत्या केली तर पत्नी आपल्याला सोडून गेल्याने हादरून गेलेल्या पतीने देखील दुसऱ्या दिवशी गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेने संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला घटना घडल्यामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. ही घटना कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे घडलीय. दिवाळीला जाण्यासाठी पतीने विरोध केल्यानंतर पत्नीने घरातच […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्यावर मोठा हल्ला, एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल

एका सुपरस्टार अभिनेत्यासोबत आज एक विचित्र आणि जिवघेणा प्रकार घडला आहे. हा अभिनेता आणि त्याची संपू्र्ण टीम  जेव्हा बंगळूर विमानतळावर पोहोचले, तेव्हा एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालं नसलं, तरी इतका कडेकोट बंदोबस्त असताना देखील असा हल्ला केल्याने लोकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या […]