ताज्याघडामोडी

९ तारखेपासून गुगल अकाउंटवर लॉग इन करण्याचा मार्ग बदलणार, काय आहे जाणून घ्या!

तुम्ही यापुढे फक्त एका क्लिकवर Google खात्यात लॉग इन करू शकणार नाही. तुमच्या Google खात्यात लॉग इन करण्यासाठी, तुम्हाला आता टू स्टेप व्हेरिफिकेशन प्रक्रियेतून जावे लागेल. 9 नोव्हेंबरपासून सर्वांसाठी ही प्रक्रिया सक्तीची केली जात आहे. कंपनीचे म्हणणे आहे की सुरक्षेचा विचार करून टू-स्टेप व्हेरिफिकेशन लागू करणे अत्यंत आवश्यक करण्यात आले आहे.

कंपनीने या वर्षी ऑक्टोबरमध्ये आपल्या एका ब्लॉकमध्ये ही माहिती शेअर केली होती. यात सांगितले होते की प्रत्येकाने त्यांच्या Google खात्यात लॉग इन करण्यासाठी टू-स्टेप व्हेरिफिकेशन करणे आवश्यक आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे, सुमारे १५० दशलक्ष Google वापरकर्ते आपोआप या प्रक्रियेचा एक भाग बनतील.

जर वापरकर्त्याने टू-स्टेप व्हेरिफिकेशन केले नाही, तर त्यांना Google खात्यात लॉग इन करण्याची परवानगी दिली जाणार नाही. याशिवाय गुगलने असेही म्हटले आहे की सुमारे २० लाख यूट्यूब निर्मात्यांना देखील हे फीचर स्वीकारावे लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *