गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सट्टेबाजीचे 4 लाख वसूल करण्यासाठी तरुणाचं अपहरण; बेदम मारहाण करत 1 लाख लुटले

मोबाइलवर खेळलेल्या सट्टेबाजीचे चार लाख रुपये वसूल करण्यासाठी 5 जणांनी एका तरुणाचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी तरुणाचं अपहरण करून त्याला लाथाबुक्क्यांनी, पाइप आणि कंबरेच्या बेल्टने बेदम मारहाण केली आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी तरुणाच्या खिशात ठेवलेल्या सोन्याच्या अंगठ्या आणि गुगल पे वरून 15 हजार रुपये ट्रान्सफर करून घेतले […]

ताज्याघडामोडी

“काय होतास तू? काय झालास तू?”; देवेंद्र फडणवीसांनी उडवली संजय राऊतांची खिल्ली

भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची आजची बैठक चर्चेचा विषय ठरली ते देवेंद्र फडणवीसांमुळे. त्यांनी आजच्या बैठकीत ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. भ्रष्टाचार, महिला सुरक्षा, अमरावती हिंसाचार अशा अनेक मुद्द्यावर भाष्य करत त्यांनी राज्य सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. याबरोबरच त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांनाही टोला लगावत खोचक टीका केली आहे. काय होतास तू काय झालास तू […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

राष्ट्रवादी युवती काँग्रेसची पदाधिकारीच निघाली दुचाकी चोरीतील आरोपी

वाहनचोरांमुळे त्रस्त असलेल्या चंद्रपूर शहरामध्ये एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. चंद्रपूरच्या स्थानिक गुन्हे शाखेने वाहनचोरांच्या एका टोळीला अटक केली आहे.या टोळींमध्ये तरुणांबरोबर एका तरुणीचाही समावेश आहे. ही तरुणी राष्ट्रवादी युवती काँग्रेसशी संबंधित असल्याची माहिती यामध्ये स्पष्ट झाली आहे. अटक झालेल्या या युवतीचे नाव वैष्णवी देवतळे असे आहे. ती आपल्या दोन साथीदारांसह वाहनांची चोरी करायची असं पोलिसांनी […]

ताज्याघडामोडी

आधी पैसे भरा, मग वीज वापरा, ठाकरे सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

राज्य सरकारने शेतकऱ्यांचं थकीत वीज बील माफ करावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती तालुक्यातील धुमाळवाडी येथील पतसंस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी बोलताना वीज बील माफ करण्याची मागणी अजित पवारांकडे केली. यावेळी ठाकरे सरकार नवीन सिस्टीम आणण्याच्या विचारात असल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलं. थकीत वीज बील माफ करण्याच्या […]

ताज्याघडामोडी

एसटी संपाचा तिढा कायम; हायकोर्टानं दिला ‘हा’ अंतरिम आदेश

एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेला एसटी संप मिटण्याची शक्यताधुसर झाली आहे. हा संप सुरूच ठेवणार असल्याचं संपकरी कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज मुंबई उच्च न्यायालयात सांगण्यात आलं. एसटीच्या संपावर उच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. दोन्ही बाजूंकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. राज्य सरकार न्यायालयानं दिलेल्या निर्देशांचं पालन करत आहे. त्यानुसार विलिनीकरणाच्या […]

ताज्याघडामोडी

५ दिवसांवर आलं होतं लग्न; मुलगी घर सोडून पळून गेली, वडिलांनी उचललं टोकाचं पाऊल

महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. लग्न पाच दिवसांवर आले असताना, नवरी मुलगी घरातून पळून गेली. समाजात बदनामी होईल या भीतीनं मुलीच्या वडिलांनी शनिवारी रात्री आत्महत्या केली. औरंगाबाद शहरातील संग्राम नगरजवळ ही घटना घडली. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. ड्रायव्हर म्हणून काम करत असलेल्या ४८ वर्षीय वडिलांनी घराजवळच आत्महत्या केली. कुटुंबीयांची बदनामी होईल या भीतीने […]

ताज्याघडामोडी

लस घ्या अन्यथा शासकीय लाभावर निर्बंध – जि.प.सिईओ दिलीप स्वामी 

सोलापूर – कोरोना गेला नाही. सराव कामे बाजूला ठेवून लसीकरण करा. लसीकरणास साथ न दिलेस शासकीय लाभावर निर्बंध असणार आहेत. अशी माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. अचानक लसीकरण केंद्र व गोपाळपूर येथे भेट दिले मुळे अधिकारी कर्मचारी धास्तीने होते..!  आज गोपाळपूर ग्रामपंचायत येथे कमी लसीकरणाचे पार्श्वभुमीवर भेट देऊन ग्रामस्थांशी […]

ताज्याघडामोडी

एसटी संपावर आज न्यायालयात सुनावणी, 3987 कर्मचारी कामावर रुजू

एसटी महामंडळाच्या संपाची काडी फुटण्यास सुरुवात झाली असून रविवारी 3987 कर्मचारी कामावर हजर झाले. तसेच राज्याच्या विविध भागांतून रविवारी 79 बसेस चालविण्यात आल्या असून त्यातून 1746 प्रवाशांनी प्रवास केला. गेले 18 दिवस एसटी कामगारांचा संप सुरू असून सोमवारी या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याची मागणी करीत गेले अनेक दिवस एसटी […]

ताज्याघडामोडी

मंत्रालयाच्या दारात एसटीच्या महिला कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

मंत्रालयासमोर एसटी कर्मचारी असलेल्या एका महिलेनं आत्मदहनाचा प्रयत्न केल्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.13 दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि आंदोलन सुरू आहे. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांनी आपला निषेध नोंदवला आहे. मुंबई येथील मंत्रालयासमोर काही कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडले. आत्मदहनाचा प्रयत्न झाल्यावर पोलिसांनी त्या महिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला.’आम्ही तुमच्या पाया पडतो. आमच्या मागण्या मान्य […]

ताज्याघडामोडी

राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये पुढचे 5 दिवस वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

शेतकरी आणि बागायतदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुढे चार दिवस पुन्हा पावसाचे असणार आहेत. नोव्हेंबरच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यातही पावसानं थैमान घातलं होतं. आता पुन्हा एकदा पुढचे 4 दिवस राज्यात पाऊस असणार आहे. पुढील चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. हवामान विभागानं […]