ताज्याघडामोडी

लस घ्या अन्यथा शासकीय लाभावर निर्बंध – जि.प.सिईओ दिलीप स्वामी 

सोलापूर – कोरोना गेला नाही. सराव कामे बाजूला ठेवून लसीकरण करा. लसीकरणास साथ न दिलेस शासकीय लाभावर निर्बंध असणार आहेत. अशी माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली. अचानक लसीकरण केंद्र व गोपाळपूर येथे भेट दिले मुळे अधिकारी कर्मचारी धास्तीने होते..! 

आज गोपाळपूर ग्रामपंचायत येथे कमी लसीकरणाचे पार्श्वभुमीवर भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला. दरम्यान त्यांनी विठ्ठल रूक्मिणी मंदिर समिती मधील वेदांत भक्त निवास व पत्रा शेड दर्शन रांगेतील लसीकरण केंद्रास भेट दिली. या प्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. एकनाथ बोधले, सरपंच विलास मस्के, दिलीप गुरव, उप सरपंच विक्रम आसबे, ग्राप सदस्य उदय पवार, अरूण बनसोडे, राजेंद्र बनसोडे, अजय जाधव, दिपक सुरवसे, सचिन आसबे, उपस्थित होते. 

सिईओ दिलीप स्वामी यांनी गोपाळपूर येथील प्राचीन गोपाळकृष्ण मंदिर परिसराची पाहणी केली. वारकरी यांचे साठी स्वच्छता विषयक सुविधांचा पाहणी करून नादुरूस्त सार्वजनिक शौचालय पुर्ण करणेचे सुचना दिल्या. गोपाळपूर लसीकरणात मागे असले बाबत त्यांनी ग्रामस्थ व ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य यांचेशी संवाद साधला. 

नमामी चंद्रभागेसाठी लोकसहभाग द्यावा- सिईओ स्वामी 

नमामी चंद्रभागा अंतर्गत गोपाळपूर ची निवड करणेत आली आहे. सांडपाणी व्यवस्थापनचा आराखडा पुर्ण करणेत आला आहे. घनकचरा व्यवस्थापना साठी जागा उपलब्ध करून देणेत येत आहे. चंद्रभागा नदीचे प्रदुषण होणार नाही याची काळजी घ्या. नदी स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक वारकरी व ग्रामस्थ यांची जबाबदारी आहे. 

लसीचे दोन डोस घेतलेले वारकरी अधिक . .! 

जिल्हा परिषद व पंढरपूर नगरपालिका प्रशासनाने मोठी मेहनत घेऊन वेदांत भक्त निवास, मठ, दर्शन रांग, गोपाळपूर ग्रामपंचायत येथे लसीकरण केंद्र उभारले होते. सर्व कर्मचारी तैनात करणेत आले होते. त्या नुसार डोसची उपलब्धतेवर करणेत आली होती. सायंकाळी पाच वाजे पर्यंत चारशे वारकरी यांनी डोस घेतले आहेत. मोठ्या प्रमाणावर लोक डोस घेतले होते. दोन्ही डोस घेतलेलींची संख्या जास्त होती. त्याचाही परिणाम लसीकरणावर झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *