गेल्या काही महिन्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर शंभरीपार पोहोचले आहेत. वाढत्या इंधन दरामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यातच पेट्रोल आणि डिझेलमध्ये भेसळ, गाडीत इंधन भरताना आकड्यांमध्ये फेरफार करणं, इंधनचोरी आदी गैरप्रकार वाढले आहेत. यामुळे अर्थातच ग्राहकांना दुहेरी फटका सहन करावा लागत आहे. उत्तर प्रदेशातल्या आग्रा इथल्या एका पेट्रोल पंपावर असाच एक गैरप्रकार नुकताच उजेडात आला […]
ताज्याघडामोडी
ओला इलेकट्रीक स्कुटर आवडली,गुगलवर सर्च करताच आला व्हाटस अपवर मेसेज
पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथील तरुण विजय ज्ञानेश्वर पवार याना ओला स्कुटर एस-1 प्रो या गाडीची माहिती इंटरनेटवरून मिळाली होती. सदर स्कुटर ही बटरीवर चालणारी व जास्त रेंज देणारी असल्याने त्यांना ती आवडली असल्याने गुगलवर सर्च केले असता विजय पवार याना व्हाट्स अपवर मेसेज आला.व 9830328719 या मोबाईल नंबर वर संपर्क करणेबाबत सांगितले.मो.नं.8274060174 वरून फिर्यादीस फोन आला एक अनोळखी व्यक्ती […]
कोविशील्डचा तिसरा डोस ओमायक्रॉनविरूद्ध जबरदस्त पॉवरफुल
जगभरात वेगाने पसरत चाललेल्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या अवताराने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. तिसरी लाट आली तर ती ओयामक्रॉनमुळेच असेल असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. या चिंतेच्या वातावरणात एक दिलासा देणारी बातमी पुढे आली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनात दिसून आलं आहे की अॅस्ट्राझेनेका लसीचा बूस्टर डोस घेतलेल्यांमध्ये ओमायक्रॉनविरूद्ध लढा देणाऱ्या अँटीबॉडी वेगाने […]
राज्यात पुन्हा निर्बंध; आज नवी नियमावली जाहीर होणार
राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत […]
करुणा मुंडेंची नव्या राजकीय पक्षाची घोषणा; पहिल्याच दिवशी केला धक्कादायक खुलासा
राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांमुळे चर्चेत आलेल्या त्यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी आता नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे. ‘शिवशक्ती सेना’ असं त्यांच्या पक्षाचं नाव असणार आहे. काही मंत्र्यांच्या बायकांनीही माझ्याशी संपर्क केला असून त्यांनी माझ्या पक्ष स्थापनेला पाठिंबा दिला, असा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. नगरमध्ये ३० जानेवारीला मोठा […]
दहा पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह व अपर पोलीस अधीक्षक पराग मणेरे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे तर पाच पोलीस उपायुक्त व पाच सहाय्यक आयुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या अशी दहा जणांच्या निलंबनाची शिफारस करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी बुधवारी विधानसभेत लेखी प्रश्नोत्तरात दिली. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह अन्य पोलिसांना […]
भूमिअभिलेख कार्यालयातील लाचखोर महिला लिपिकाला सक्तमजुरी
मोजणी केलेल्या गटाच्या नकाशात हिश्श्यांची निशाणी करून देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना पकडलेल्या भूमिअभिलेख कार्यालयातील महिला लिपिकाला चार वर्षे सक्तमजुरी आणि 20 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जुलै 2017 मध्ये नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली होती. ज्योती दत्तात्रय डफळ उर्फ ज्योती संदिप नराल असे या महिला लिपिकाचे नाव आहे. […]
आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई क्राइम ब्रांचच्या सायबर सेलनं अटक केली. जयसिंह राजपूत असं या आरोपीचं नाव आहे. व्हॉट्सअॅपवर मेसेज करून आरोपीने आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा चाहता असल्याचा दावा त्याने स्वतः केला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे […]
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीस पक्षाने उमेदवारी दिल्यास द्यावी लागणार कारणे
गुन्हेगारी पार्श्वभूमीवर उमेदवार देताना यापुढे आता मोठी खबरदारी घ्यावी लागणार आहे. राजकारणातील गुन्हेगारीकरणाला धक्का देण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठे पाऊल उचलले आहे. नव्या नियमावलीनुसार आता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यास त्यामागची कारण द्यावी लागणार आहे. निवडणुकीसाठी उभे राहिलेल्या उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर जनतेला समजली पाहिजे, अशी भूमिका निवडणूक आयोगाने घेतली आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे उमेदवाराचं […]
अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूकीस प्रतिबंध करण्यासाठी तालुका स्तरावर भरारी पथकाची स्थापना!
गेवराई तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूकीस प्रतिबंध करण्यासाठी तालुका स्तरावर भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.या भरारी पथकाने एप्रिल ते ऑक्टोबर 2021 या काळात 51 प्रकरणात 1 कोटी 21 लाख 79 हजार एवढी दंडात्मक कारवाई केल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत सांगितले. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील सुरळेगांव येथील गोदावरी नदी पात्रात अवैधरित्या […]











