ताज्याघडामोडी

दहा पोलीस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह व अपर पोलीस अधीक्षक पराग मणेरे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे तर पाच पोलीस उपायुक्त व पाच सहाय्यक आयुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या अशी दहा जणांच्या निलंबनाची शिफारस करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांनी बुधवारी विधानसभेत लेखी प्रश्नोत्तरात दिली.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह अन्य पोलिसांना निलंबित करण्याच्या प्रस्तावाबाबत अबू आझमी यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर परमबीर सिंह व 29 पोलीस अधिकारी व कर्मचारी अशा एकूण 30 जणांच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

या गुन्ह्यांचा निःपक्षपातीपणे तपास करण्यासाठी त्यांना पोलीस सेवेत ठेवणे योग्य होणार नसल्याचे नमूद करून त्यांना पोलीस सेवेतून निलंबित करण्याची शिफारस सरकारला केली आहे. यामध्ये पाच उपायुक्त व पाच सहाय्यक आयुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱयांचा समावेश असल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे.

त्यांच्याविरुद्ध दाखल गुह्यांमध्ये वैयक्तिकरीत्या काय सहभाग आहे, त्यांच्याविरुद्ध दाखल असलेल्या गुह्यांमध्ये प्रत्येक अधिकाऱयाकडून काय अनियमितता घडली आहे याचा प्रत्येक अधिकाऱयाच्या नावासह तपशील उपलब्ध करून देण्याबाबत राज्य सरकारकडून पोलीस महासंचालकांना कळवले होते त्यानुसार राज्य सरकारला अहवाल मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *