ताज्याघडामोडी

आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला मुंबई क्राइम ब्रांचच्या सायबर सेलनं अटक केली. जयसिंह राजपूत असं या आरोपीचं नाव आहे. व्हॉट्सअॅपवर मेसेज करून आरोपीने आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा चाहता असल्याचा दावा त्याने स्वतः केला आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ३४ वर्षीय आरोपीला सायबर पोलिसांनी बेंगळुरूतून अटक केली. आरोपीने आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअॅपवर मेसेज करून धमकी दिली होती. तत्पूर्वी आरोपीने ८ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सअॅपवर मेसेज केला होता.

यात त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच या मेसेजमधून सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूला जबाबदार ठरवण्यात आले. त्यानंतर त्याने तिनदा फोन केला. पण ठाकरे यांना तो उचलला नाही. त्यानंतर आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा मेसेज पाठवला. ठाकरे यांनी यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा चाहता असल्याचा दावा आरोपीने केला आहे. ठाकरे यांना त्याने मेसेज पाठवून धमकी दिली होती. तसेच त्यांच्याबद्दल अपशब्द वापरले होते. सायबर पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास सुरू केला होता. आरोपी हा बेंगळुरूत होता. तेथून त्याला अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *