गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

ओला इलेकट्रीक स्कुटर आवडली,गुगलवर सर्च करताच आला व्हाटस अपवर मेसेज

पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथील तरुण विजय ज्ञानेश्वर पवार याना ओला स्कुटर एस-1 प्रो या गाडीची माहिती इंटरनेटवरून मिळाली होती.
सदर स्कुटर ही बटरीवर चालणारी व जास्त रेंज देणारी असल्याने त्यांना ती आवडली असल्याने गुगलवर सर्च केले असता विजय पवार याना व्हाट्स अपवर मेसेज आला.व 9830328719 या मोबाईल नंबर वर संपर्क करणेबाबत सांगितले.मो.नं.8274060174 वरून फिर्यादीस फोन आला एक अनोळखी व्यक्ती हिंदी भाषेत स्कुटरची माहिती देवून स्कुटरची किंमत 124999/- अशी सांगुन व्हट्सअँप व्दारे ओला स्कुटरचे डिटेल्स व फिचर्स इत्यादी पाठविले.
त्यावेळी त्याने फिर्यादीचे पनकार्ड, आधारकार्ड , मतदान कार्ड , बकेचे पासबुकची कापी व एक आयडेंटी साईजचा फोटो व ईमेल आयडी असे व्हट्सअँप वर पाठविण्याबाबत फोनवरून बोलणे करून सांगितले. पैसे भरण्यासाठी सांगुन व्हट्सअँप वर बंक अकाऊंटची डिटेल दिले ते कर्नाटका बकेचे अकाऊंट नंबर 4382500101334001 IFSC CODE कोड KARB0000094 आसा होता.
फिर्यादीने ओला स्कुटर ऑनलाईन पद्धतीने खरेदी करण्यासाठी वेळोवेळी 75000/- रू भरले असून भरलेल्या पैशाची खोटी पावती देऊन फसवणुक केली आहे केली अशा आशयाची फिर्याद पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *