ताज्याघडामोडी

“एकनाथ शिंदेंनी धनुष्यबाण आणि शिवसेनेवर दावा टाळायला हवा होता”, बच्चू कडूंचं मोठं विधान; म्हणाले, “लायकी नसल्याने.”

शिवसेनेत फूट पडल्याने राज्यातील जनतेत नकारात्मक वातावरण झालं आहे. पण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ही नकारात्मता मोडून काढतील. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले इथेपर्यंत ठिक होतं. मात्र, धनुष्यबाण आणि शिवसेनेवर एकनाथ शिंदेंनी दावा टाळायला पाहिजे होता. हे एकनाथ शिंदेंना बोलून दाखवलं होतं. परंतु, काहीपण झालं तरी सत्ता पाहिजे, हा राजकारणी लोकांचा धर्म आहे, […]

ताज्याघडामोडी

नेहमी बाबा सोडायला जायचे, आज आई गेली; शाळेत जाण्याआधी मायलेकीवर काळाचा घाला

बन्नेरघट्टा इथे सिमेंट-काँक्रीट मिक्सर घेऊन चाललेल्या एका ट्रकचा ताबा सुटल्याने तो एका कारवर उलटला. त्यामुळे कारमधल्या आई आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला. ही महिला तिच्या मुलीला शाळेत सोडायला जात असताना हा अपघात झाला. पोलिसांनी ट्रकच्या मालकाची ओळख पटवली आहे. पोलिसांची पथकं त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायत्री कुमार (वय 47) नावाची महिला तिची […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर -मंगळवेढा मतदार संघातील रस्त्याच्या कामांसाठी ३४ कोटींचा निधी मंजूर

आमदार समाधान आवताडे यांचा यशस्वी पाठपुरावा  मतदार संघाचा चेहरा – मोहरा बदलण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय -मोहन बागल पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील रस्त्यांसाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा – २ अंतर्गत मतदारसंघातील रस्त्यांच्या दर्जा उन्नतीसाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या माध्यमातून ३४ कोटी ३१ लाख […]

ताज्याघडामोडी

काँग्रेस, राष्ट्रवादीने प्रचार न केल्याचा आरोप, मविआ उमेदवार शुभांगी पाटील स्पष्टच म्हणाल्या, “बलाढ्य शक्तींनी.”

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि आमदार सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकासआघाडीने शुभांगी पाटील यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केलं.  मात्र, मविआच्या उमेदवार असूनही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शुभांगी पाटील यांचा प्रचार केला नाही आणि अनेक ठिकाणी त्यांचे बुथही नव्हते, असा आरोप होतो आहे. यावर स्वतः शुभांगी […]

ताज्याघडामोडी

५ वर्षीय सिम्मीची हत्या, मारेकऱ्याने आधी तिचा गळा दाबला आणि नंतर कान कापले

उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये बेपत्ता झालेल्या पाच वर्षीय मुलीचा मृतदेह गावाबाहेर सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुलीच्या डोक्याला आणि कानाजवळ जखमेच्या खुणा आहेत. त्यामुळे जुन्या वैमनस्यातून तिची हत्या झाल्याची शक्यता आहे. ही घटना जिल्ह्यातील फतेहपूर चौरासी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुशलपुरा गावातली आहे. पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता […]

ताज्याघडामोडी

आधीच परीक्षेचं टेन्शन, त्यात परीक्षा केंद्रावर फक्त 500 मुलीच, एकटा मुलगा घाबरुन पडला बेशुद्ध

परीक्षा देण्यासाठी पोहचलेल्या केंद्रावर 500 मुलींमध्ये एकच मुलगा होता. परीक्षा आणि या मुलींचं टेन्शन घेऊन हा मुलगा चक्क बेशुद्ध पडल्याची आश्चर्यजनक घटना घडली आहे. बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील ही घटना आहे. या सगळ्या गोंधळातच या विद्यार्थ्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. आता या प्रकाराची चर्चा सगळीकडे रंगते आहे. बिहारशरीफच्या अल्लामा इक्बाल कॉलेजचा विद्यार्थी मनीस शंकर हा इंटर […]

ताज्याघडामोडी

कुणाल टिळकांना थेट फोन आला, तुमचं तिकिट भाजपनं फायनल केलं अन् नंतर वेगळंच घडलं !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं डिजिटल इंडियाचं स्वप्न साकार होत आहे. डिजिटल इंडियामुळे सर्वसामान्यांची अनेक कामे आता चुटकीसरशी होऊ लागली आहेत.यामुळं नागरिकांच्या वेळेची आणि पैशांचही बचत होत असल्याचं दिसून येत आहे. डिजिटल इंडियाचे अनेक फायदे होत असले तरी दुष्परिणामही खूप भयानक असल्याचे स्पष्ट झालं आहे.  एकीकडं डिजिटल इंडियास प्रतिसाद वाढत असताना दुसरीकडं सायबर गुन्हेगारांनाही आपले हातपाय […]

ताज्याघडामोडी

नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या

खरपुडी शिवारातील हरी गोविंद नगर येथे त्यांनी आपल्या राहत्या घरात सिलिंग फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे.घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सय्यद माजीद, पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, हेड कॉन्स्टेबल संदीप बेराड यांच्यासह पालीकेचे मुख्याधीकारी, अधिकारी कर्मचारी तसेच अनेक नगरसेवक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह […]

ताज्याघडामोडी

सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या 79 व्या जयंती निमित्त.., तुंगत मध्ये मोफत सर्व रोगनिदान व औषधपचार शिबिर

सहकार शिरोमणी वसंतदादा काळे यांच्या 79 व्या जयंती निमित्त मोफत सर्व रोगनिदान व औषधपचार शिबिराचे आयोजन पंढरपूर तालुक्यात दि.29/01/2023 ते 05/01/2023 या कालवधीत विभागवार पटवर्धनकुरोली, तुंगत, कासेगांव, तसेच भाळवणी कारखाना साईटवर केलेले आहे. त्या अनुषंगाने दि.01/02/2023 रोजी तुंगत येथील शिबीरात 270 रुग्ण तपासणी करुन औषधोपचार करण्यात आले. सदर कार्यक्रम प्रसंगी तुंगत ग्रामपंचायतीचे सरपंच डॉ सौ […]

ताज्याघडामोडी

प्रेयसी फोन उचलत नाही म्हणून प्रियकर तापला, रस्त्यात गाठलं अन् विषारी औषध पाजलं

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे विषारी औषध पाजून १९ वर्षीय प्रेयसीला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसी फोन उचलत नाही, बोलत नाही या गोष्टीचा राग मनात धरून २२ वर्षीय तरुणाने हे कृत्य केलं. इतकंच नाही तर त्याने स्वत: देखील विषारी औषध घेऊन स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर दोघांनाही उपचारांसाठी सेवाग्राम रुग्णालयात […]