ताज्याघडामोडी

कुणाल टिळकांना थेट फोन आला, तुमचं तिकिट भाजपनं फायनल केलं अन् नंतर वेगळंच घडलं !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं डिजिटल इंडियाचं स्वप्न साकार होत आहे. डिजिटल इंडियामुळे सर्वसामान्यांची अनेक कामे आता चुटकीसरशी होऊ लागली आहेत.यामुळं नागरिकांच्या वेळेची आणि पैशांचही बचत होत असल्याचं दिसून येत आहे. डिजिटल इंडियाचे अनेक फायदे होत असले तरी दुष्परिणामही खूप भयानक असल्याचे स्पष्ट झालं आहे. 

एकीकडं डिजिटल इंडियास प्रतिसाद वाढत असताना दुसरीकडं सायबर गुन्हेगारांनाही आपले हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. हे गुन्हेगार दररोज नवनवीन शक्कल लढवून नागरिकांना सावज करण्याचा प्रयत्न करतात. आता कसबा विधनसभेतील एका बड्या इच्छुकाला फोन करून पैशांची मागणी केल्याचं समोर आलं आहे.

सायबर गुन्हेगार फोन करून बँकेचा कर्मचारी असल्याचे सांगून नागरिकांचे बँकखाते रिकामे करीत असल्याचे अनेक प्रकार दररोज घडत आहेत. आता पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला मोर्चा इच्छुकांकडे वळविल्याचं दिसून येत आहे. 

कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी कुणाल टिळक इच्छूक आहेत. त्यांना काही दिवसांपूर्वी एक कॉल आला होता. त्यावेळी त्यांना तुमचं तिकीट भाजपने निश्चित केल्यांच सांगण्यात आलं. तसेच एका बँकखात्यावर काही रक्कम पाठविण्यास सांगितल्याचं आता समोर आलं आहे.

पुण्यातील कसबा विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर सगळ्या पक्षांनी तयारी सुरू केली आहे. कुणाल टिळक हे दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव आहेत. ते कसब्यातून भाजप पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत. त्यांनांच काही दिवसांपूर्वी एक फोन आला होता. त्यातून त्यांच्याकडे ७६ हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. यातू टिळक यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *