खरपुडी शिवारातील हरी गोविंद नगर येथे त्यांनी आपल्या राहत्या घरात सिलिंग फॅनला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले आहे.घटनेची माहिती मिळताच तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सय्यद माजीद, पोलीस कॉन्स्टेबल किशोर जाधव, हेड कॉन्स्टेबल संदीप बेराड यांच्यासह पालीकेचे मुख्याधीकारी, अधिकारी कर्मचारी तसेच अनेक नगरसेवक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
रात्रभरापासून ते मानसिक तणावमध्ये होते. रात्री तीन वाजता ते घरातून विहिरीमध्ये उडी घेण्यासाठी निघाले असताना बायकोने त्यांना समजावून ओढून घरात आणले. मात्र, घरात येताच त्यांनी रूममध्ये प्रवेश केला आणि आत मधून कडी लावून घेतली. त्यांची बायको बाहेरच उभी राहिली होती. त्या नंतर ही घटना घडल्याचे समजते. अनंता लांडे यांनी टोकाचे पाऊल उचलण्यामागे दबाव किंवा घरगुती प्रकरण आहे का याचे कारण नेमके अजून पर्यंत समजू शकले नाही.
TITAN EDGE CERAMIC
SLIMMEST CERAMIC WATCH IN THE UNIVERSE
AVAILABLE ON OFFER
टायटन वर्ल्ड | टायटन आय +
एस टी स्टॅन्ड जवळ ,भोपळे रोड ,सांगोला
संपर्क – 7507 995 995