ताज्याघडामोडी

काँग्रेस, राष्ट्रवादीने प्रचार न केल्याचा आरोप, मविआ उमेदवार शुभांगी पाटील स्पष्टच म्हणाल्या, “बलाढ्य शक्तींनी.”

नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आणि आमदार सुधीर तांबे यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकासआघाडीने शुभांगी पाटील यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केलं. 

मात्र, मविआच्या उमेदवार असूनही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शुभांगी पाटील यांचा प्रचार केला नाही आणि अनेक ठिकाणी त्यांचे बुथही नव्हते, असा आरोप होतो आहे. यावर स्वतः शुभांगी पाटील यांनी स्पष्ट भूमिका घेतली.

शुभांगी पाटील म्हणाल्या, “मविआतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने माझ्यासाठी प्रचार केला नाही याविषयी मला तरी माहिती नाही. जळगाव, धुळे, नंदूरबार, अहमदनगर किंवा नाशिकमध्ये प्रत्येक ठिकाणी मी पोहचण्याआधी महाविकासआघाडीचे नेतेमंडळी हजर होते. मला रस्त्यावर घेण्यासाठीही तेच होते. त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी काम केलं नाही, असा कोणताही विषय नाही.”

“मला जेवायला वेळ मिळत नव्हता, तर लोक मला खायला घेऊन येत होते. माझ्याजवळ रडत होते. शुभांगी पाटीलवर जितकं प्रेम केलं, तितकं प्रेम जनतेने कोणावरच केलं नसेल. मी भाग्यवान आहे. त्यामुळे कोणी काहीही सांगो, बलाढ्यशक्तींनी सांगितलं तरी विजय माझा आहे,” असं मत शुभांगी पाटील यांनी व्यक्त केलं.

काँग्रेसचे कार्यकर्ते उघडपणे भाजपाचा प्रचार करताना दिसले. त्यांच्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार करणार का? असा प्रश्न विचारला असता शुभांगी पाटील म्हणाल्या, “मी वरिष्ठांकडे तक्रार करणार नाही. तो माझा विषय नाही. माझा विषय फक्त काम करणं आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *