ताज्याघडामोडी

कार्तिकी यात्रा 2023 साठी पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज.

प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात,भाविकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी उपाययोजना  अवघ्या महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेल्या श्री.क्षेत्र पंढरपूर येथे दि.23/11/2023 रोजी कार्तिकी यात्रा भरत असुन येणा-या लाखो भाविक वारक-यांना सेवा सुविधा पुरविण्याकामी मा.जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, नगरपरिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ.प्रशांत जाधव यांनी दिली.   पंढरपूर शहरामध्ये […]

ताज्याघडामोडी

आ समाधान आवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

प्रतिनिधी- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे विकासरत्न आमदार समाधान आवताडे यांच्या ४७ व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांमध्ये विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. सदर कार्यक्रमांमध्ये मंगळवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ०९ ते सायं.५ पर्यंत आमदार जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे रक्तदान शिबीर संपन्न होणार आहे. त्याचबरोबर २१ नोव्हेंबर पासून प्रत्येक गावोगावी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पत्नीचे अवैध संबंध, घरात पडलेली चिठ्ठी अन् 4 सडलेले मृतदेह; अख्खं कुटुंब क्षणात संपलं, हादरवणारी घटना

एक अतिशय हादरवणारी घटना नुकतीच समोर आली आहे. पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा जिल्ह्यात एकाच कुटुंबातील चार सदस्यांचे मृतदेह विकृत अवस्थेत त्यांच्या फ्लॅटमध्ये आढळून आले आहेत. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, 52 वर्षीय कापड व्यावसायिक वृंदाबन कर्माकर, त्यांची पत्नी देबश्री कर्माकर वय 40), त्यांची 17 वर्षांची मुलगी देबलीना आणि 8 […]

ताज्याघडामोडी

मोबाईलवर सतत गेम खेळत असल्यानं रागावले वडील; मुलानं संपवलं जीवन

मोबाईलवर सतत गेम खेळत असल्यानं वडिलांनी रागवल्यानं 16 वर्षीय मुलानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. याप्रकरणी मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आलीय. मालवणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता 11 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानं यापूर्वीही गेम खेळण्यापासून रोखल्यास स्वत:चं नुकसान करण्याची धमकी घरच्यांना दिली होती. या मुलाला मोबाईलवर ऑनलाइन गेम खेळण्याचं व्यसन होतं. गुरुवारी […]

ताज्याघडामोडी

पित्याचा वारंवार अत्याचार, बळजबरीने गर्भपात, मुलीच्या मृत्यूनंतर आईनं अन्यायाला वाचा फोडली

पित्यानेच आपल्या मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नालासोपारा परिसरात समोर आली आहे. आरोपी पिता मारहाण करून स्वतःच्या मुलीवर अत्याचार करत होता. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात आरोपी पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २२ वर्षाची पिडीत तरुणी ही नालासोपारा परिसरात वास्तव्यास होती. गेल्या काही महिन्यांपासून पीडित तरुणीला क्षयरोग झाल्याने तिला गेल्या आठवड्यात मुंबईतील जे जे रुग्णालयात […]

ताज्याघडामोडी

क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोन घेणे आता आणखी कठीण; RBIने कठोर केले नियम

बहुतांश लोक त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक कर्ज म्हणजेच पर्सनल लोन आणि क्रेडिट कार्डचा अवलंब करतात. भारतीय बँका आणि नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्या (NBFCs) क्रेडिट कार्ड आणि वैयक्तिक कर्जासारखी असुरक्षित कर्जे जारी करतात. मात्र, आता क्रेडिट कार्ड मिळवणे आणि वैयक्तिक कर्ज घेणे कठीण होऊ शकते. रिझर्व्ह बँकेने काही नियम कडक केले आहेत. RBI ने बँका […]

ताज्याघडामोडी

1 जानेवारीपासून या लोकांचा UPI ID होणार बंद

सध्या डिजिटल मार्केटिंगचे जग आहे. त्यामुळे सर्वच ठिकाणी आर्थिक व्यवहार हे ऑनलाइन पद्धतीने केले जातात. ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करण्यासाठी प्रत्येक स्मार्टफोनमध्ये Google pay, Phone Pay याचप्रकारे UPI हे ऑप्शन देखील उपलब्ध आहे. त्यामुळे मोबाईलच्या माध्यमातून छोटे मोठे पेमेंट केले जातात. ऑनलाइन बँकिंगच्या माध्यमातून बरेच जण कॅश बाळगत नाही. भाजीपाला घेण्यापासून ते कॉलेजची फीस भरण्यापर्यंत सर्व […]

ताज्याघडामोडी

दूध दर समितीने पडलेल्या दूध दराबाबत तात्काळ निर्णय घ्यावा-आ समाधान आवताडे

प्रतिनिधी  पंढरपूर मतदारसंघात दुग्ध व्यवसाय हा महत्वाचा उपजीविकेचा व्यवसाय आहे, दोन महिन्यांपूर्वी ३.५/८.५ गुणवत्तेला ३९ ते ४० रुपये दुधाचा दर मिळत होता मात्र सध्या तो दर कमी होऊन 25 ते 28 रुपयापर्यंत खाली आला आहे त्यामुळे दूध व्यवसाय अडचणीत आला असून उत्पादन खर्चही निघेना असे झाला आहे तरी शासनाने ठरवून दिलेला किमान 34 रुपये इतका […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

१२ हजार रुपयांसाठी भाजप पदाधिकाऱ्याची हत्या

मजुरीचे १२ हजार रुपये न दिल्यामुळे भाजपचे नागपूर जिल्हा पदाधिकारी, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्याची हत्या झाल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी नागपूर ग्रामीण पोलिसांनी मध्य प्रदेशातून दोन जणांना अटक केलीय. विशेषकुमार रामदास रघुवंशी (वय ३३, रा. मंडला) आणि आदी चंद्रामणी नायक (वय ३०, रा. ओदिशा) अशी अटक करण्यात आलेल्या मारेकरीची नावे आहेत. हत्या झालेल्या भाजप […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

तरुणीने लग्नाला दिला नकार…तरुणाने सात वाहने पेटवली

एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तब्बल सात वाहने पेटवून दिल्याची खळबळजनक घटना नाशिकच्या काठे गल्ली परिसरात घडली आहे. यात संबंधित तरुणीच्या दोन गाड्या आणि इतर पाच अशा सात वाहनांची जाळपोळ करण्यात आली असून सर्व वाहने जळून खाक झाली आहेत. या घटनेनंतर भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात दोघांना अटक केली आहे. […]