गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

१२ हजार रुपयांसाठी भाजप पदाधिकाऱ्याची हत्या

मजुरीचे १२ हजार रुपये न दिल्यामुळे भाजपचे नागपूर जिल्हा पदाधिकारी, माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्याची हत्या झाल्याची घटना रविवारी घडली. याप्रकरणी नागपूर ग्रामीण पोलिसांनी मध्य प्रदेशातून दोन जणांना अटक केलीय. विशेषकुमार रामदास रघुवंशी (वय ३३, रा. मंडला) आणि आदी चंद्रामणी नायक (वय ३०, रा. ओदिशा) अशी अटक करण्यात आलेल्या मारेकरीची नावे आहेत. हत्या झालेल्या भाजप जिल्हा पदाधिकारीचे नाव राजू डेंगरे आहे. 

अटक करण्यात आलेल्या मारेकरींनी आपला गुन्हा कबूल केलाय. आपल्या मजुरीचे पैसे न मिळाल्यानं आपणच राजू यांची हत्या केल्याची कबुली त्यांनी पोलिसांसमोर दिलीय. घटनेप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशेषकुमार आणि आदी हे राजू डेंगरे यांच्या ढाब्यावर काम करत होते. दिवाळीनिमित्त त्यांना गावाला जायचं होतं. त्यासाठी त्यांनी राजू डेंगरे यांच्याशी पैशांची मागणी केली.

गावाला जाण्यापूर्वी विशेषकुमार आणि आदी यांनी राजू यांच्याकडे पैशांची मागणी केली होती. त्यांना राजू यांच्याकडून प्रत्येकी ६ हजार रुपये असे एकूण १२ हजार रुपये घ्यायचे होते. मात्र राजू ही रक्कम देण्यासाठी टाळाटाळ करीत होते. यावरून त्यांच्यात वादही झाला होता. राजू डेंगरे पैसे देत नसल्यानं दोघेही चिडले होते. पैसे देत नसल्याच्या रागात त्यांनी डेंगरे यांच्या हत्येचा कट रचला.

रविवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास विशेषकुमारनं आदीच्या मदतीने राजू यांचा कपड्यानं गळा आवळला. त्यानंतर चाकूने वार करत राजू यांची हत्या केली. राजू यांच्या अंगावर ब्लँकेट टाकत दोघेही कार घेऊन फरार झाले. होते. दुसऱ्या दिवशी ही घटना उघडकीस आल्यानंतर भाजपच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *