ताज्याघडामोडी

कोरोनाबाधितांना ग्रामपंचायतीसाठी करता येणार मतदान

मुंबई : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आता कोरोनाबाधिताला आता मतदान करता येणार आहे. निवडणूक आयोगाने ही परवानगी दिली आहे. कोविड बाधित मतदारांना मतदान समाप्तीच्या अर्धा तास आधी मतदानाची सुविधा दिली आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही माहिती दिली.  बाधित आणि विलगीकरण कक्षातल्या व्यक्ती, तसेच दोनदा तपासणीनंतरही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांना मतदानाची […]

ताज्याघडामोडी

सरपंच आणि सदस्यपदाचा लिलाव करणाऱ्या ग्रामपंचायतींना दणका, निवडणूक रद्द

नाशिक जिल्ह्यातील उमराणे (ता. देवळा) आणि नंदुरबार जिल्ह्यातील खोंडामळी (ता. नंदुरबार) या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत सरपंच व सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबद्दलचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या ग्रामपंचायतींची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द केली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे केली. मदान यांनी सांगितले की, उमराणे आणि खोंडामळी ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत […]

ताज्याघडामोडी

जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम

सोलापूर, दि.13: सोलापूर जिल्ह्यात 16 जानेवारीपासून कोविड लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 30 हजार 184 आरोग्य कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना लस दिली जाईल. लसीकरण मोहिमेसाठी सर्व प्राथमिक तयारी झाली असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे सांगितले. पालकमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड लसीकरणाबाबत बैठक झाली. त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली. बैठकीला […]

ताज्याघडामोडी

स्वेरीत राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी

स्वेरीत राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी     पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ यांची ४२३  वी तर  स्वामी विवेकानंद यांची १५८ वी जयंती साजरी करण्यात आली.           स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीत […]

ताज्याघडामोडी

इसबावी येथे तलाठी कार्यालय सुरू करण्याची मा.नगरसेवक बालाजी मलपे यांची मागणी

पंढरपूर (प्रतिनिधी)-पंढरपूर शहरातील सर्वात मोठे उपनगर असलेल्या इसबावी भागाकरिता स्वतंञ तलाठी कार्यालय करण्याची मागणी पंढरपूर नगरपरिषदेचे मा. नगरसेवक बालाजी मलपे यांनी पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून इसबावी भागाचे तलाठी कार्यालय हे पंढरपूर तालुक्यातील इसबावी पासुन 5 ते सहा कि.मी. असलेल्या लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत येथे टाकळी व इसबावी […]

ताज्याघडामोडी

मंगळवेढ्यात 4 हजार 600 ब्रास जप्त वाळू साठ्याचा लिलाव

पंढरपूर, दि. 12:- जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव मंगळवार दिनांक 19 जानेवारी 2021 रोजी दुपारी 12.00 वाजता  उपविभागीय अधिकारी  कार्यालय, मंगळवेढा येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली आहे.      मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर येथे अवैध वाळू वाहतुक व साठ्यावर केलेल्या कारवाईत सन 2018-19 मध्ये संयुक्त वाळू ठेक्याच्या  लिलावामधील शिल्लक असलेल्या  […]

ताज्याघडामोडी

पहिल्या टप्प्यातील लसीकरणासाठी पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमधून देशभरात लस रवाना

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटट ऑफ इंडियामधून कोव्हिड-19 लशीची पहिली खेप रवाना करण्यात आली आहे. मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सिरम इंन्स्टिट्युटमधून कोरोना विरोधी ‘कोव्हिशिल्ड’ लस देशातील विविध राज्यांसाठी पुणे एअरपोर्टकडे रवाना करण्यात आली. पण, ही लस कोणत्या राज्यांकडे रवाना करण्यात आली याबाबत सीरम इन्स्टिट्यूटकडून माहिती मिळू शकलेली नाही.16 जानेवारीपासून देशात कोरोनाविरोधी लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. […]

ताज्याघडामोडी पंढरी वार्ता न्युज पोर्टल

भाविकांना 20 जानेवारीपासून ऑनलाईन पासाशिवाय दर्शन

दिवाळी पाडव्यापासून राज्यातील मंदिरे उघडली मात्र विठ्ठल मंदिराने दर्शनासाठी ऑनलाईन पद्धत सुरु केली होती. त्यामुळे राज्यातून आणि राज्याबाहेरून येणाऱ्या भाविकांना नामदेव पायरीचे दर्शन घेऊनच परत फिरावे लागत होते. एकाबाजूला ऑनलाईन व्यवस्थेची माहितीच भाविकांपर्यंत न पोहोचल्याने शेकडो किलोमीटर लांबून आलेल्या भाविकांना देवाचे दर्शन न घेताच निराश मनाने परत फिरावे लागत होते. याचे वास्तव ABP माझाने मांडत […]

ताज्याघडामोडी

कोरोना प्रतिबंधक लसीची अधिकृत किंमत सीरमने जाहिर केली

लवकरच कोरोना लसीकरणाला देशात सुरुवात होणार असून केंद्र सरकारकडून पुण्याच्या ‘सीरम इंस्टिट्यूट’ला लसीची पहिली ऑर्डर मिळाल्याचीही माहिती समोर आली आहे. केंद्र सरकारने सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाला पहिली ऑर्डर दिल्याचे वृत्त एएनआय या वृत्त संस्थेने दिले आहे. त्याचबरोबर लसीची अधिकृत किंमत देखील समोर आली आहे. २०० रुपये एवढी लसीच्या एका डोसची किंमत असणार असल्याची माहिती सीरम […]

ताज्याघडामोडी

निवडणूकीचे कामकाज जबाबदारीने पार पाडा

पंढरपूर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 348 मतदान केंद्र होते त्यापैकी एकूण 17 वार्ड बिनविरोध झाल्याने 331 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीसाठी दि.15 जानेवारीला सार्वत्रिक मतदान घेतले जाणार असून, ग्रामपंचायत निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व मतदान प्रक्रिया जबाबदारीने पार पाडाव्यात अशा सूचना तहसिलदार तथा निवडणूक प्रधिकृत अधिकारी विवेक सांळुखे यांनी दिल्या.   पंढरपूर तालुक्यातील 71 […]