‘महिंद्रा अँड महिंद्रा’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील दोन विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. अॅटोमोटिव्ह क्षेत्राशी संबंधीत असलेल्या ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ या बहुराष्ट्रीय कंपनीच्या समितीने निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून इंजिनिअरिंगच्या महेश सुनील देशमुख व ऋतुजा […]
ताज्याघडामोडी
चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खर्डीत आरोग्य,नेत्र तपासणी व रक्तदान शिबिर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत आबा पाटील यांचा येथे १ऑगस्ट रोजी वाढदिवस असल्याने पंढरपूर तालुक्यात तसेच पंचक्रोशीत विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन केले असता आज दिनांक २७जुलै रोजी खर्डी येथे रक्तदान शिबिर तसेच आरोग्य तपासणी शिबिर व नेत्रदान तपासणी शिबिराचा लाभ नागरिकांनी घेतला. ज्यांनी सोलापूर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्राच्या […]
शेताच्या बांधावरच घडली धक्कादायक घटना, वाद विकोपाला गेल्यावर झाडली गोळी, बापलेकाचा गेला जीव
नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील मलगाव येथे शेतीच्या बांधावरून झालेल्या वादादरम्यान थेट गावठी कट्ट्याने फायरिंग करण्यात आली आली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. तर यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील मलगावचा पिपलीपाडा येथे दोन परिवारांमध्ये हा वाद झाल्याचे […]
स्वेरीच्या दोन विद्यार्थिनींची ‘डेलॉइट’ या कंपनीत निवड
‘डेलॉइट’ या बहुराष्ट्रीय कंपनीने घेतलेल्या मुलाखतीत गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील दोन विद्यार्थिनींची कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली. आय.टी. क्षेत्राशी संबंधीत लंडन येथे मुख्यालय असलेल्या ‘डेलॉइट’ या बहुराष्ट्रीय कंपनी कडून स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. कंपनीच्या […]
“न्यु सातारा’ चे विद्यार्थी अमोल मुडे व अश्विनी गवळी यांची Tata Motors pvt.ltd.pune या कंपनीत निवड
पंढरपूर कोर्टी- येथील न्यू सातारा पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या घेतलेल्या मुलाखतीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील एका विद्यार्थ्यांची व इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकॉमुनिकेशन विभागातील एका विद्यार्थिनीची Tata Moters Pvt.Ltd pune या कंपनीत निवड झाली आहे. अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री .राजाराम निकम साहेब यांनी दिली. न्यू सातारा महाविद्यालयाच्या स्थापनेपासून प्लेसमेंटच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांना नोकरी देण्यात आल्या आहेत. […]
महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा; ७ जिल्ह्यांना रेड अलर्ट
राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस बरसतो आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरू आहे. अशात मध्यंतरी काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यामुळे दुबार पेरणीचं संकटही ओढावलेलं. मात्र, आता सातत्याने होत असलेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यामुळे अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती ओढावली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशात […]
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती सुरू, येत्या तीन महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करणार
राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या तीन महिन्यांत २४ ऑक्टोबरपर्यंत शिक्षकभरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली. यावेळी त्यांनी शिक्षक भरती प्रक्रियेचा कार्यक्रमही जाहीर केलाशिक्षक सदस्य सुधाकर अडबाले यांनी शिक्षकभरतीबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला […]
फॅबटेक टेक्नीकल कॅम्पस मध्ये नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया आणि एन.डी.एल.आय. क्लब या विषयी ऑनलाईन वेबिनार संपन्न
सांगोला : फॅबटेक टेक्निकल कॅम्पस ,कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अॅण्ड रिसर्च ग्रंथालय विभाग यांच्या वतीने नॅशनल डिजिटल लायब्ररी ऑफ इंडिया आणि एन.डी.एल.आय. क्लब या विषयी वापरकर्ता जागरूकता ऑनलाईन वेबिनार संपन्न झाला. नॅशनल डिजीटल लायब्ररी ऑफ इंडिया हे शिकण्याच्या संसाधनांचे एक आभासी भांडार आहे जे केवळ शोध/ब्राउझ सुविधा असलेले भांडारच नाही तर पाठ्यपुस्तके, लेख, व्हिडिओ, ऑडिओ बुक्स, व्याख्याने, सिम्युलेशन, फिक्शन आणि इतर सर्व प्रकारच्या शिक्षण माध्यमांचा समावेश असलेल्या सेवा उपलब्ध […]
जमिनीच्या वादातून दोन कुटुंबात हाणामारी; तरुणाने थेट आणली तलवार अन्…
छत्रपती संभाजीनगर: शहरातील वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी येथे शेतीच्या वादातून दोन कुटुंबामध्ये तुफान हाणामारी पहायला मिळाली. या मारामारीत यामध्ये एका कुटुंबाने दुसऱ्या कुटुंबावर तलवारीने वार केले. अंगावर शहारे आणणारा हा संपूर्ण प्रकार व्हिडिओमध्ये कैद झाला आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील काही जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी […]
अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेच्या जिल्हाअध्यक्षपदी प्रतिक राजेंद्र साळुंखे यांची निवड
अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष पदी प्रतिक राजेंद्र साळुंखे यांची एकमताने निवड करण्यात आली. प्रतिक साळुंखे हे गेली अनेक वर्षे मराठा समाजाचे काम करीत आहेत. मराठा महासंघाच्या प्रत्येक आंदोलनात नेहमीच अग्रणी असतात. त्यांची समाजाविषयी असलेली तळमळ पाहून व त्यांच्यात असलेले संघटन कौशल्य पाहूनच अशा अभ्यासू युवा नेतृत्वाची निवड करण्यात आली असे मराठा […]