अखिल भारतीय मराठा महासंघ विद्यार्थी संघटनेच्या कोल्हापूर जिल्हाअध्यक्ष पदी प्रतिक राजेंद्र साळुंखे यांची एकमताने निवड करण्यात आली. प्रतिक साळुंखे हे गेली अनेक वर्षे मराठा समाजाचे काम करीत आहेत. मराठा महासंघाच्या प्रत्येक आंदोलनात नेहमीच अग्रणी असतात. त्यांची समाजाविषयी असलेली तळमळ पाहून व त्यांच्यात असलेले संघटन कौशल्य पाहूनच अशा अभ्यासू युवा नेतृत्वाची निवड करण्यात आली असे मराठा महासंघाच्या वतीने सांगण्यात आले. मराठा महासंघाचे कार्य जिल्ह्यातील तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी व विद्यार्थी संघटना मजबूत करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय व हितासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिक साळुंखे यांनी सांगितले. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी महासंघाचे जिल्हाअध्यक्ष शशिकांत पाटील, युवक जिल्हाअध्यक्ष अवधूत पाटील तसेच पदाधिकारी कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.
