ताज्याघडामोडी

अभ्यासक्रमासाठी व निवडणूक, इतर कारणाकरीता जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

सन 2020-21 करिता शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी व निवडणूक, इतर कारणाकरीता जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज ऑनलाईन स्वरुपात दि. 01 ऑगस्ट, 2020 पासून स्वीकारण्यात येत असून, अर्जनिहाय सेवा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरण्याची सोय देखील दि.12 डिसेंबर, 2020 पासून अर्जदार यांचे सोयीकरिता उपलब्ध करण्यात आलेली आहे, अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे मुख्य समन्वयक आणि डॉ. […]

ताज्याघडामोडी

अहिल्यादेवी सोलापूर विध्यापीठाच्या स्मारक समितीची घोषणा 

अहिल्यादेवी सोलापूर विध्यापीठाच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदी पालकमंत्री तर कुलगुरू कार्याध्यक्षा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक समितीची घोषणा आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली. पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे या समितीचे अध्यक्ष तर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस समितीच्या कार्याध्यक्षा असतील. तसेच या स्मारकामध्ये शिल्पकृती उभारण्यासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस, मुंबई येथील आणि […]

ताज्याघडामोडी

चर्चा तर होणारच! शपथविधीसाठी सरपंचाची थेट हेलिकॉप्टरमधून एन्ट्री

संगमनेर तालुक्यातील आंबी दुमाला गावात हा सोहळा झाला. पुण्यात उद्योजक असलेले जालिंदर गागरे या गावाचे सरंपच झाले आहेत. त्यांनी दुपारी हेलिकॉप्टरने गावात प्रवेश केला. त्यानंतर बारा बैलांच्या गाडीतून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यास आख्खा गाव लोटला होता. नव्या सरपंचाचे आणि सदस्यांचे गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. या गावातील उद्योजक जालींदर गागरे यांच्या पुणे येथे अनेक […]

ताज्याघडामोडी

काँग्रेस खासदाराची जीभ घसरली; नानांच्या सोहळ्यादरम्यान व्यासपीठावरुन वादग्रस्त शब्दाचा वापर

मुंबई, 12 फेब्रुवारी : आज नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची शपथ घेतली. या कार्यक्रमात मोठी गर्दी जमा झाली होती. त्यामुळे व्यासपीठावरुन अनेक पदाधिकाऱ्यांना खाली उतरवण्यात आलं. त्यामुळे नानांच्या कार्यक्रमात मानापमानाचं नाट्य रंगलेले पाहायला मिळालं. दरम्यान काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी या सोहळ्यात भाषण देताना चक्क शिवी दिल्याचं समोर आलं आहे. धोनोरकर यांनी व्यासपीठावर भाषण करताना पीएम […]

ताज्याघडामोडी

दीड लाखांचं बिल भरलं नाही म्हणून वीज कनेक्शन कापलं

नागपूर, 12 फेब्रुवारी: लॉकडाऊनच्या काळात अनेक कुटुंबीयांना महावितरणाने वाढीव वीजबिलं पाठवली आहेत. अशातचं नागपूर महावितरणाने एका कुटुंबाला तब्बल 1 लाख 43 हजार 300 रुपयांचं वीजबिल पाठवलं आहे. या घटनेमुळे नागपूर महावितरणाचा ओंगळ कारभार समोर आला आहे. लॉकडाऊच्या काळात राज्यसरकारने वीजबिल कमी करण्याचं आश्वासन दिलं असताना नागपूर महावितरणाने नागपूरमधील अब्दुल अल्ताफ यांना ऑगस्ट महिन्यात तब्बल 61 […]

ताज्याघडामोडी

घाबरू नका,इंटरनॅशनल डॉन माझ्या ओळखीचे आहेत !

शिवसेनेने भाजपात गेलेल्या नाईक गटाचे नगरसेवक फोडल्याने गणेश नाईक यांच्या जिव्हारी लागले असून आपल्या समर्थकासमोर बोलताना त्यांनी  घाबरू नका,इंटरनॅशनल डॉन माझ्या ओळखीचे आहेत ! असे विधान केल्यामुळे खळबळ उडाली आहे.     यावर शिवसेनेने देखील लगेचच प्रत्यूत्तर दिले असून गणेश नाईक इंटरनॅशनल डॉन असतील तर आम्ही नवी मुंबईत डॉन आहोत, असे शिवसेना नगरसेवक विजय चौगुले यांनी […]

ताज्याघडामोडी

आत्महत्या केलेल्या ”त्या”तरुणीच्या लॅपटॉपमध्ये अनेक महत्वपूर्ण गोष्टी ?

पूजा लहू चव्हाण (वय २२,मुळ रा.बीड ) या तरुणीने मध्यरात्रीच्या सुमारास इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना पुणे येथे काल घडली आहे.  तरुणीच्या आत्महत्येनंतर तिचे विदर्भातील एका मंत्र्यासोबत प्रेमसंबंध असून त्यातूनच तीने आत्महत्या केल्याची चर्चा सोशल मिडियावर सुरु होती. मात्र पोलिसांनी असे काही असल्याचे स्पष्ट शब्दांत नाकारले होते. अशातच आता भाजपने याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे.    भाजपचे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

नवरदेवांचे स्वप्नभंग करणाऱ्या टोळीला बेड्या

पुणे गुन्हे शाखेने खोटे लग्न करुन कुटुंबांना लुटणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीतील 9 महिला आणि 2 पुरुषांना अटक केले असून, इतर आरोपींचा शोध सुरू आहे. या टोळीने आतापर्यंत 50 पेक्षा जास्त कुटुंबांना लुटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही खोटे लग्न करणारी टोळी महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकात सक्रिय होती. यातील महिलांनी आतापर्यंत 50 […]

ताज्याघडामोडी

क्या बात! ‘या’ गावच्या ग्रामपंचायतीवर 55 वर्षे एकाच कुटुंबातील सरपंच

अहमदनगर : काही दिवसांपूर्वीच राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आणि पाहतापाहता गावगाड्यात किमया करणाऱ्या अनेकांच्याच नावांची चर्चा झाली. यातच एक असं कुटुंबही प्रकाशझोतात आलं, ज्यानं ग्रामपंचायत निवडणूक गाजवण्याचा जणू विक्रमच केला. अहमदनगर येथील लोहसर गावात एकाच कुटुंबाने आपल्याच घरात 55 वर्ष ग्रामपंचायची सत्ता राखण्यात यश मिळावलं आहे. मागील 55 वर्षांपासून ग्रामपंचायतीची सत्ता येथील गीते कुटुंबाकडे […]

ताज्याघडामोडी

पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठाच्या ‘सृजनरंग नियतकालिक स्पर्धा २०१९-२०’ मध्ये ‘स्वेरी’ अभियांत्रिकी प्रथम

 पंढरपूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूरच्या ‘सृजनरंग नियतकालिक स्पर्धा २०१९-२०’ मध्ये विद्यापीठ संलग्नित सर्व महाविद्यालयांमधून गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन ॲन्ड रिसर्च इस्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या ‘एक्सप्लोरर’ या वार्षिक नियतकालीकाला प्रथम क्रमांक मिळाला असल्याची माहिती स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.            […]