पूजा लहू चव्हाण (वय २२,मुळ रा.बीड ) या तरुणीने मध्यरात्रीच्या सुमारास इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना पुणे येथे काल घडली आहे. तरुणीच्या आत्महत्येनंतर तिचे विदर्भातील एका मंत्र्यासोबत प्रेमसंबंध असून त्यातूनच तीने आत्महत्या केल्याची चर्चा सोशल मिडियावर सुरु होती. मात्र पोलिसांनी असे काही असल्याचे स्पष्ट शब्दांत नाकारले होते. अशातच आता भाजपने याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे.
