गावातील शेतात जमिनीत गाडलेले जिवंत नवजात अर्भक गावकऱ्यांना सापडले. या घटनेने साऱ्या गावात एकच खळबळ माजली. गावकऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती देऊन त्याला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर येथील मुसानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुलंदर गावचं हे प्रकरण आहे. गावातीलच कुठल्या महिलेने या जिवंत अर्भकला मातीत गाडल्याचं […]
ताज्याघडामोडी
तरुणाने बेकायदा पिस्तूल आणलं; मित्राला दाखवण्यासाठी बोलवलं, तेवढ्यातच नको ते घडून बसलं
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बेकायदा खरेदी केलेले पिस्तूल हाताळताना त्यातून उडालेली गोळी मित्राच्या मानेला चाटून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी उत्तमनागर पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. खडकवासला परिसरातील सांगरुण गावात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभय छगन वाईकर (२२) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी आविष्कार उर्फ […]
महिला मंदिरातून घराकडे निघाली; रिक्षात बसली, अन्…, धक्कादायक घटनेनं परिसरात खळबळ
डोंबिवली पूर्वेतील एक महिला शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास खिडकाळेश्वर मंदिरात गेली होती. दर्शन घेऊन घरी जाण्यासाठी ती एका रिक्षात बसली. त्यात एक प्रवासी आधीच बसला होता. महिलेने रिक्षा चालकाला कोळेगावात जायचे असे सांगितले. परंतु रिक्षा चालकाने आणि पाठी बसलेल्या त्याचा साथीदाराने आपसात संगनमत करुन एका निर्जनस्थळी नेऊन रस्त्यावरच महिलेला धारधार शस्त्र दाखवत तिला निर्वस्त्र […]
महागाई भत्ता 42 टक्के करा, मूळ वेतनात वाढ करा; प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे 11 सप्टेंबरपासून पुन्हा बेमुदत उपोषण
राज्य सरकारने एसटीकर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ केली असली तरी त्यामध्ये अजून चार टक्के वाढ करावी, एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा यासह प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचारी 11 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. येत्या 11 तारखेपासून मुंबईतील आझाद मैदानावर हा संप करण्यात येणार असून त्याची प्रशासनाने दखल घेतली नाही तर 13 सप्टेंबरपासून राज्यभर […]
राज्यासाठी २४ तास महत्त्वाचे, मुंबई, ठाण्यासह २९ जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट
राज्यात दडी मारलेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाल्यामुळे राज्यातल्या बहुतांश भागांत महिन्याभरात पाऊस असेल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यावेळी कोकण, मराठवाडा, विदर्भासह राज्यात इतरत्र पाऊस होणार असून आज अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर एका जिल्ह्यात मात्र ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रायगड, ठाणे, पुणे, […]
एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्ता वाढवला, ९० हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना होणार लाभ
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३४ टक्क्यांवरून वाढवून ३८ टक्के इतका करण्याचा निर्णय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाला मान्यता दिली आहे. या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील सुमारे ९० हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. तर राज्य सरकारवर ९ कोटींचा बोजा पडणार आहे. सध्या राज्य […]
राष्ट्रवादीच्या आमदाराला टॅक्सीचालकाची जीवे मारण्याची धमकी, भररस्त्यात टॅक्सीतून उतरवलं
मुंबईत एका टॅक्सी चालकानं राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कोरमोरे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी कोरमोरे यांनी वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी आता टॅक्सी चालक इरफान अली (वय ३५) याला अटक केली आहे. झालं असं की, भंडारा जिल्ह्यातील तुमसर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कोरमोरे हे बुधवारी दिल्लीहून […]
“देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा, न्यायालयाने ‘त्या’ प्रकरणात दोषमुक्त केले”
निवडणूक प्रतिज्ञापत्र प्रकरणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वकील सतीश उके यांनी उपमुख्यमंत्र्यांविरोधात दाखल केलेली याचिका जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्यायालयाने शुक्रवारी हा आदेश दिला. फडणवीस यांनी त्यांच्यावरील दोन गुन्हे लपवल्याचा आरोप करणारी याचिका ॲड. सतीश उके यांनी जिल्हा न्यायालयात दाखल केली होती. फडणवीस यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी याचिकेत […]
पठ्ठ्याचं भलतचं धाडस; घरासमोरच ‘ती’ झाडे लावली, पोलिसांना गुप्त माहिती मिळाली, अन् नंतर…
अनेक नागरिकांना आपल्या घराजवळ अनेक प्रकारची झाडे लावण्याचा छंद असतो. त्यात फुलांची झाडे, फळांची झाडे, शो ची झाडे लावली जातात. मात्र पिंपरी चिंचवड परिसरात असणाऱ्या पिंपळे निलख एका बहाद्दराने थेट घरासमोर असणाऱ्या मोकळ्या जागेत गांजाची झाडे लावण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे जवळ राहणाऱ्यांनी कपाळालाच हात मारला. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे निलख परिसरात […]
पावसानं पाठ फिरवली,सोयाबीन वाळायला लागलेलं, शेतकरी फ्यूज लावायला गेला अन् अनर्थ
डोक्यावर चार लाखांचं खासगी कर्ज, अर्धा एकर शेती त्यात पावसाने दिलेला दगा करायचं काय या चिंतेत असलेले शेतकरी गोपाळ भोजने यांच्या डोळ्यासमोर सोयाबीनचे पीक वाळत होतं. हातातोंडाशी आलेलं पीक जगावायच्या प्रयत्नात विजेचा धक्का बसल्यानं भोजने यांनी जीव गमावला. फ्यूज टाकताना त्यांना विजेचा धक्का लागला अन् त्यात त्यांचा मृत्यू झाला. पत्नी तीन मुलं अन् आई असं […]