ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून आपल्या वडिलांसाठी लॅपटॉप ऑर्डर केल्यानंतर एका व्यक्तीला त्या ऐवजी जे पार्सल आले त्यामुळे त्याला धक्काच बसला.यानंतर जेव्हा त्याने कंपनीकडे तक्रार केली तेव्हा त्याला आणखी एक धक्का बसला, त्याला ‘नो रिटर्न पॉलिसी’चे कारण देत कोणतीही कारवाई करण्यास नकार देण्यात आला. यशस्वी शर्मा हे आयआयएम अहमदाबादचे विद्यार्थी आहे. त्यांनी फ्लिपकार्ट वर सुरू असलेल्या बिग-बिलियन […]
ताज्याघडामोडी
ट्रॅक्टर आणि कारचा अपघात, अपघातात ट्रॅक्टरचे दोन तुकडे
ट्रॅक्टर सोबत झालेल्या धडकेत नेहमी समोरच्या गाडीचे नुकसान झालेले पहायला मिळते. कित्येकदा कार आणि ट्रॅक्टरच्या अपघातात नेहमी कारचा चक्काचुर झालेले दिसून येते. तिरूपती मध्ये झालेल्या एका अपघातात चक्क मर्सिडीज कारला धडकून ट्रॅक्टरचे दोन तुकडे झालेले पहायला मिळाले आहे. मजबूत समजल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर सोबत झालेल्या या भीषण अपघातामुळे कारच्या सुरक्षाविषयक फिचर्सबाबत सोशल मीडियावरील चर्चांना उधान आले […]
बुरखा घालण्यास मनाई केल्याने इकबालने केली रुपालीची हत्या!
बुरखा घातला नाही म्हणून पत्नीची गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार चेंबूरमध्ये घडल्याचे उघड झाले आहे. इकबाल अहमद शेख (वय 36), असे आरोपीचे नाव असून तो टॅक्सीचालक होता. हिंदू तरूणीने 3 वर्षांपूर्वी एका मुस्लिम तरूणाशी विवाह केला होता. दोघांचाही धर्म वेगवेगळा असल्यामुळे त्यांच्या प्रेमात धर्म आडवा येणार नाही, हे लग्नाच्या वेळीच ठरले होते. मुलगी हिंदू […]
स्वेरीमध्ये ‘ऑलम्पस २के२२’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा समारोप
शिक्षणाबरोबरच संस्कृतीचे महत्व जपले पाहिजे -माजी विद्यार्थी धनुर्धर अर्जुनदास ‘आपण आध्यात्मिकते सोबतच लॉजीकली विचार केला पाहिजे कारण शिक्षण आणि संस्कृती या दोन्ही बाबींचा समन्वय असला पाहिजे. यासाठी केवळ अंगी असलेली कौशल्ये पुरेशी नाहीत, तर त्यांची कृतीतून अंमलबजावणी झाली पाहिजे त्यामुळे शिक्षण आणि संस्कृतीचे महत्व अधिक वाढते आणि विकास होण्यास सुरवात होते त्यामुळे शिक्षणाबरोबरच संस्कृतीचे महत्व जपले […]
अमावास्येच्या रात्री तरूणींवर अघोरी कृत्य करणाऱ्या दोन भोंदू मांत्रिकासह ७ जणांना अटक
सर्वपित्री अमावास्येच्या रात्री भूत आणि करणीची बाधा झालेल्या तरुणीवर तंत्रमंत्र विद्येच्या द्वारे भयानक अघोरी कृत्य करणाऱ्या भोंदू मांत्रिकाचा डाव गावकऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने उधळून लावला आहे. ही घटना मुरबाड तालुक्यातील सोनगावातील भोंदू मांत्रिकाच्या घरात घडली आहे. याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात भादंवि कलम 34, सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणाप्रतिबंध, समुळ […]
या आहेत नव्या विकास आराखड्यावरील 34 महत्वपूर्ण हरकती व सूचना
वारकरी संप्रदाय पाईक संघाने दाखल केल्या ३४ सूचना व हरकती १)उद्धव घाट ते विप्रदत्त घाट असा पाठीमागील बाजुने ‘पाईक सेतू ‘ हा खास दिंड्यांसाठी प्रदक्षणा पुल तयार करुन तांबडा मारुती ते कालिका देवी चौक या रोडवरील सर्व दिंड्या रथ या पुलावरुन नेल्यास एकादशी दिवशीहोणारी महाद्वार घाट व चौक परिसरातील ५०% गर्दी कमी होईल २) […]
अनैतिक संबंधातून डाॅक्टर पतीला टोचले भुलीचे इंजेक्शन; पत्नी विरोधात गुन्हा दाखल
दुसऱ्या पत्नीचे अनैतिक संबंध डाॅक्टर पतीला समजताच त्याने तिला व तिच्या प्रियकराला विचारणा करून वाद घातला. त्यानंतर पत्नीचा पारा चढल्याने तिने हाॅस्पिटलमध्येच डाॅक्टर पतीला भुलीचे इंजेक्शन देत ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या म्हसरूळ येथील एका हाॅस्पिटलमध्ये घडली. याप्रकरणी पीडित डॉक्टरच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून डॉक्टरच्या दुसऱ्या पत्नीसह तिच्या प्रियकराविरुद्ध म्हसरुळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात […]
पंढरपूर सिंहगडच्या २ विद्यार्थिनीचे जापनीज जेएलपीटी एन५ परीक्षेत यश
जापनीज भाषा शिकविणारे पंढरपूर सिंहगड जिल्ह्यातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय पंढरपूर: प्रतिनिधी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मधुन नोकरी मिळविणे हा हेतु असतो. विद्यार्थ्यांना आय टी कंपनीत नोकरी मिळावी यासाठी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये जापनीज भाषेचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. हि भाषा आय. टी. क्षेत्रातील कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण […]
शिक्षकाच्या मारहाणीत दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, परीक्षेत केली होती चूक
उत्तर प्रदेशमधील औरेया येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीतील विद्यार्थी निखिल याने परीक्षेत केलेल्या चुकीमुळे शिक्षकाने त्याला मारहाण केली आणि त्यात त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. औरेया येथील अल्छदामधील आदर्श इंटर विद्यालयाचा विद्यार्थी निखिलने सामाजिक विज्ञानच्या परीक्षेत काही चुकीचे उत्तर लिहले होते. यावरून शिक्षक अश्वनी सिंग चांगल्याच भडकल्या आणि त्याला मारहाण केली. मारहाणीमुळे निखिलची […]
राज्यात २० हजार पदांसाठी पोलीस भरती होणार; बैठकीनंतर देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहखात्याच्या बैठकीनंतर महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करून आम्ही पोलीस भरतीबाबत निर्णय घेतला आहे. राज्यात पोलिसांची २० हजार पदे भरण्यात येणार आहेत. ८ हजार पदांबाबत जाहिरात निघाली असून आणखी १२ हजार पदांची जाहिरात लवकरच काढण्यात येईल,’ अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे. राज्यातील हजारो […]











