ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या २ विद्यार्थिनीचे जापनीज जेएलपीटी एन५ परीक्षेत यश

जापनीज भाषा शिकविणारे पंढरपूर सिंहगड जिल्ह्यातील एकमेव अभियांत्रिकी महाविद्यालय

पंढरपूर: प्रतिनिधी 

अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मधुन नोकरी मिळविणे हा हेतु असतो. विद्यार्थ्यांना आय टी कंपनीत नोकरी मिळावी यासाठी कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये जापनीज भाषेचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. हि भाषा आय. टी. क्षेत्रातील कंपनीत नोकरी मिळविण्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे. एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग पंढरपूर महाविद्यालय हे जापनीज भाषा शिकविणारे सोलापूर जिल्ह्यातील एकमेव इंजिनिअरींग काॅलेज असुन या काॅलेज मध्ये शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या एखतपुर (ता. सांगोला) येथील कुमारी मानसी सोमनाथ नवले आणि तनाळी (ता. पंढरपूर) येथील सोनाली बापु मोटे या दोन विद्यार्थिनींनी जापनीज जेएलपीटी एन५ परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असल्याची माहिती काॅलेजचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

विद्यार्थ्यांना जापनीज भाषा शिकण्यासाठी पुणे, मुंबई येथे पंचवीस ते तीस हजार मोजावे लागतात परंतू हिच भाषा पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन माध्यमातून मोफत प्रशिक्षण दिले जाते. यावर्षीच्या पहिल्या बॅच मधील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील अंतीम वर्षातील कुमारी मानसी सोमनाथ नवले आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील तृतीय वर्षातील कुमारी सोनाली बापु मोटे या दोन विद्यार्थिनींनी नुकतीच जपान सरकारची “जापनीज जेएलपीटी एन ५” परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. 

प्रत्येक वर्षी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये जापनीज भाषा माहित असेलल्या विद्यार्थ्यांसाठी १० हून अधिक नामांकित आय टी क्षेत्रातील कंपन्या कॅम्पस मध्ये विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी येत असतात. जापनीज भाषेतील प्रशिक्षणामुळे इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळते.

महाविद्यालयातील पहिल्या बॅच मधुन दोन विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असुन दुसर्‍या बॅच मध्ये महाविद्यालयातील ११२ विद्यार्थ्यांना जापनीज भाषेचे मोफत प्रशिक्षण दिले जात असल्याचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी सांगितले.

पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज व जपान सरकार यांचे मध्ये नुकताच सामंजस्य करार झाला असुन जापनीज प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना जपान टोकियो मध्ये नोकरी मिळण्यास मदत होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना एन५ आणि एन४ सर्टिफिकेट मिळाले आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी थेट टोकिओ मध्ये जपान थर्ड पार्टी या कंपनीत महिन्याला अडीच लाख म्हणजे वार्षिक ३० लाख पगाराची नोकरी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना संधी मिळते. जापनीज भाषेचे प्रशिक्षण देणारे पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज जिल्ह्यातील एकमेव असुन प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य घडणार असल्याने विद्यार्थी व पालक वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *