ताज्याघडामोडी

ट्रॅक्टर आणि कारचा अपघात, अपघातात ट्रॅक्टरचे दोन तुकडे

ट्रॅक्टर सोबत झालेल्या धडकेत नेहमी समोरच्या गाडीचे नुकसान झालेले पहायला मिळते. कित्येकदा कार आणि ट्रॅक्टरच्या अपघातात नेहमी कारचा चक्काचुर झालेले दिसून येते.

तिरूपती मध्ये झालेल्या एका अपघातात चक्क मर्सिडीज कारला धडकून ट्रॅक्टरचे दोन तुकडे झालेले पहायला मिळाले आहे. मजबूत समजल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर सोबत झालेल्या या भीषण अपघातामुळे कारच्या सुरक्षाविषयक फिचर्सबाबत सोशल मीडियावरील चर्चांना उधान आले आहे.

आंध्र प्रदेश मधील तिरूपती येथील चंद्रगिरी बायपास रोडवर हा अपघात झाला. सोमवारी झालेल्या या दुर्घटनेत एक मर्सिडीज कार आणि ट्रॅक्टरची धडक झाली. चुकीच्या दिशेने येत असणाऱ्या ट्रॅक्टरने येणाऱ्या या कारला धडक दिली. दोन्ही वाहनांची धडक इतकी जोरदार होती की, आसपासच्या अपघात पाहणाऱ्यांना याचा धक्काच बसला. याचे कारण असे की, या दुर्घटनेत मर्सिडीज कारला धडकलेल्या ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले. तसेच ट्रॅक्टरला जोडलेली ट्रॉली देखील रस्त्यावर पलटी झालेली होती. तुलनेने कारचे खूप कमी नुकसान झाले.

कारमध्ये असलेले लोक किरकोळ जखमी झाले आहेत. पण या अपघातात चारचाकी मधील लोकांना फार काही इजा पोहचली नाही असे निदर्शनास आले आहे. मर्सिडीज कारच्या सुरक्षेविषयक फिचर्समुळे कारचे मोठे नुकसान टळले आहे. पण ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाला असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *