गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शिक्षकाच्या मारहाणीत दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, परीक्षेत केली होती चूक

उत्तर प्रदेशमधील औरेया येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दहावीतील विद्यार्थी निखिल याने परीक्षेत केलेल्या चुकीमुळे शिक्षकाने त्याला मारहाण केली आणि त्यात त्याचा दुर्देवी मृत्यू झाला.

औरेया येथील अल्छदामधील आदर्श इंटर विद्यालयाचा विद्यार्थी निखिलने सामाजिक विज्ञानच्या परीक्षेत काही चुकीचे उत्तर लिहले होते. यावरून शिक्षक अश्वनी सिंग चांगल्याच भडकल्या आणि त्याला मारहाण केली. मारहाणीमुळे निखिलची तब्येत बिघडली आणि त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. 

दरम्यान, पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अछल्दा पोलीस स्थानक परिसरातील रहिवासी राजू दोहरे यांनी अछल्दा पोलीस स्थानकात 24 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. खरं तर शिक्षकाने 7 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्याला मारहाण केल्यानंतर निखिलची तब्येत बिघडली होती.

24 तारखेला विद्यार्थ्याचे वडील राजू सिंग यांनी शिक्षकाविरोधात उपचारात सहकार्य न केल्याप्रकरणी आणि जातीय अपशब्दांवरून गुन्हा दाखल केला होता. यानंतर उपचारादरम्यान विद्यार्थी निखिलचा मृत्यू झाला. पोलीस अधीक्षक चारू निगम यांनी म्हटले की, 24 सप्टेंबर रोजी अछल्दा पोलीस स्थानकात राजू सिंग यांच्याद्वारे लिखित स्वरूपाची सूचना देण्यात आली होती. यामध्ये 7 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्याला केलेल्या मारहाणीचा उल्लेख होता. शिक्षकाने केलेल्या मारहाणीमुळेच विद्यार्थ्याची तब्येत बिघडली आणि त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

24 सप्टेंबर रोजी या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून मृत्यूचे खरे कारण तपासण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत. तसेच पॅनल आणि व्हिडीओ ग्राफ करण्यासाठी इटावा सीएमओशी चर्चा करण्यात आली आहे. पुढील कारवाई सुरू असून आरोपींना पकडण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *