जर तुम्हाला फाटलेली किंवा खराब नोट मिळाली असेल तर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही.कारण यावर भारतीय रिझर्व्ह बँकेने याबाबत विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. खराब नोट म्हणजे काय? आरबीआयच्या मते, खराब नोट ही नोट म्हणजे ज्याचा एक भाग गहाळ आहे किंवा जी नोट दोनपेक्षा जास्त तुकड्यांनी बनलेली आहे. “या खराब नोटा बँकेच्या कोणत्याही […]
ताज्याघडामोडी
लाभक्षेत्रातून क्षेत्र वगळण्याबाबत शेतकऱ्यांप्रती कुटील डाव थांबवावा – आ. समाधान आवताडे*
लाभक्षेत्रातून क्षेत्र वगळण्याबाबत शेतकऱ्यांप्रती कुटील डाव थांबवावा – आ. समाधान आवताडे आपल्या विहिरीला मुबलक पाणी असल्याने निरा उजवा कालवा व उजनी धरण क्षेत्रात अंतर्भाव असलेल्या उभ्या पिकांना सदर कालव्यातील पाण्याची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे कालव्यातील पाणी घेण्यात येत नाही. शासन नियमांनुसार विहिरीवरील पाणीपट्टी माफ असल्याने या क्षेत्रावरील पिकांपोटी पाणीपट्टी भरण्यात येत नाही. अशा विविध कारणांना […]
आई, मी समजून माझ्या बाळाला संभाळ
आई तू काळजी करु नकोस, मी पुन्हा तुझ्या पोटी जन्म घेईन. आई, मी समजून माझ्या बाळाला संभाळ, त्याची काळजी घे,अशा आशयाची चिट्ठी लिहून १ वर्षांपूर्वीच लग्न झालेल्या तरुणाने आत्महत्या केली आहे. पुण्यातील शिवाजीनगर – गोखलेनगर भागातील सुगम चाळीमध्ये राहणाऱ्या निखिल धोत्रे याने रविवारी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास आयुष्य संपवलं. राहत्या घरी बायकोच्या ओढणीने गळफास घेऊन […]
पुढील महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येणार
नीती आयोगाचे सदस्य व्ही.के.पॉल यांनी केंद्र सरकारा सुचना देत सांगितले की, सप्टेंबरमध्ये कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका जाणवतोय. यात गंभीर आणि मध्यम लक्षणे असलेल्या २० टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासू शकते, तर तिसऱ्या लाटेदरम्यान दिवसाला ४ ते ५ लाख जणांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता आहे. प्रत्येकी १०० कोरोनाबाधित रुग्णांपैकी २३ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल […]
पाच वर्षांत मिळणार पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला 700 वर्षांपूर्वीचे स्वरूप
ज्ञानोबा तुकाराम आदी संतांच्या काळातील म्हणजे 700 वर्षांपूर्वीचं विठ्ठल मंदिर कसं असेल? याची सगळ्यांनाच उत्कंठा लागून राहिली आहे. अशातच आता पुरातत्व विभागानं दिलेल्या विकास आराखड्याला मंदिर समितीनं मंजुरी देत तो आराखडा राज्य शासनाकडे पाठवला आहे. येत्या 5 वर्षांत हे काम पूर्ण करण्याचं नियोजन आहे. विठुरायाच्या बाबतीत नाही, घडविला नाही बैसविला ही मान्यता वारकरी संप्रदायाची आहे. […]
पारनेरच्या महिला तहसीलदाराचे आमदार निलेश लंकेंवर गंभीर आरोप; सुप्रिया सुळे म्हणाल्या…
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आत्महत्येचा इशारा दिला आहे. यावेळी ज्योती देवरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांच्यावर आरोप केले आहेत.यामुळे सध्या मोठी खळबळ माजली आहे. देवरे यांनी ऑडिओ क्लिपमध्ये वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचाही उल्लेख केलेला आहे. दरम्यान, या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया […]
राष्ट्रवादीच्या आमदारावर गंभीर आरोप; नीलम गोऱ्हे यांनी केली ‘ही’ मागणी
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांना होत असलेल्या त्रासाची वरिष्ठ महिला सचिवामार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. डॉ. गोऱ्हे यांनी स्वत: देवरे यांच्याशी संपर्क साधून त्यांची तक्रार समजून घेतली. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांकडूनही माहिती घेतली आणि मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवून ही मागणी केली आहे. तहसीलदार ज्योती देवरे यांची आत्महत्येचा इशारा देणारी […]
महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता धूसर
केंद्र आणि राज्य सरकारे संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी कंबर कसत असले तरी तज्ज्ञांच्या मते देशात तिसरी लाट येण्याची शक्यता कमी होते आहे.जरी ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट आली तरी ती दुसऱ्या लाटेप्रमाणे विनाशकारी आणि प्राणघातक असणार नाही. केंद्र सरकारच्या टास्क फोर्सने मात्र यावर टिप्पणी करणे टाळले आहे. पण, काही सदस्यांनी सांगितले की, तिसरी लाट येऊ शकत नाही. […]
सुरेश पिंगळे आत्महत्या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या दारात स्वत:ला जाळून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणारे सुरेश पिंगळे यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्यावर पुण्यातील सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. पण ते जवळपास 80 टक्के भाजले असल्याने त्यांचा कालउपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरेश यांनी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र बनवण्यासाठी हे टोकाचं पाऊल उचललं होतं. त्यांच्या कामासाठी टाळाटाळ होत असल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल […]
दोन्ही डोस घेतल्यानंतरही खासदार कोल्हेंना करोना
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना करोनाची लागण झाली आहे. अमोल कोल्हे यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. विशेष म्हणजे डॉ. कोल्हे यांनी यापूर्वीच करोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. ट्विटरवर खासदार डॉ. कोल्हे यांनी म्हटलं की, करोनाचे संकट अजूनही टळलेलं नाही. गेल्या दोन दिवसांपासून मला करोना सदृश लक्षणे दिसत आहेत. करोना प्रतिबंधक […]











