ताज्याघडामोडी

सुरेश पिंगळे आत्महत्या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित

पुणे पोलीस आयुक्तालयाच्या दारात स्वत:ला जाळून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न करणारे सुरेश पिंगळे यांची प्राणज्योत मालवली आहे. त्यांच्यावर पुण्यातील सूर्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.

पण ते जवळपास 80 टक्के भाजले असल्याने त्यांचा कालउपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरेश यांनी चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र बनवण्यासाठी हे टोकाचं पाऊल उचललं होतं. त्यांच्या कामासाठी टाळाटाळ होत असल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पुणे पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते..

संबंधीत प्रकरणामध्ये त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर आरोप केल्यानंतर पुणे पोलिसांवर मोठ्या प्रमाणात टिका झाली होती. या पार्श्‍वभुमीवर पोलिस आयुक्त गुप्ता यांनी शुक्रवारी दुपारी यासंदर्भात पत्रकार परिषद घेतली.

गुप्ता म्हणाले, ‘पिंगळे यांच्या पिशवीत दोन पत्रे सापडली आहेत. त्यापैकी आठ पानी पत्रात पिंगळे यांना गेल्या सहा महिन्यांपासून कौटुंबिक वादातून त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे नमूद केले आहे. कौटुंबिक वादामुळे ते तणावाखाली होते.

सुरेश पिंगळे आत्महत्येची घटना दुर्देवी आहे. पिंगळे नावाच्या दुसऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल होते. त्यामुळे चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यास विलंब झाल्याने त्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.’

– दिलीप वळसे – पाटील (गृहमंत्री)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *