गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सावधान! कोणी तुमच्या नावावर बनावट SIM कार्ड तर वापरत नाही ना? पाहा कसं कराल ब्लॉक

नवी दिल्ली, 23 मे : अनेकदा अशा घटना समोर आल्या आहेत, ज्यात लोकांनी त्यांच्या आयडीच्या प्रुफच्या आधारे, कोणी बनावट सिमचा वापर करत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. देशात अनेकदा गुन्हेगार बनावट सिम कार्डचा वापर करतात आणि त्या कामासाठी चुकीच्या पद्धतीने सिम मिळवतात. त्यामुळे तुमच्या नावावर कोणी बनावट, खोटं सिम कार्ड तर वापरत नाही ना, हे पाहाणं गरजेचं […]

ताज्याघडामोडी

23 दिवसात 127 रुग्ण बरे होऊन घरी परतले  करकंब कोवीड सेंटर कोरोना रुग्णांसाठी ठरतय वरदान…. समाज सेवकांनी अनेक रुग्णांना दिले जीवदान

करकंब प्रतिनिधी . जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून सेंटर सुरू करण्याबाबत झालेल्या संकल्पनेला पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील कोविड केअर सेंटर ला करकब येथील समाज सेवक सचिन शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेऊन याबाबत समाजामध्ये जनजागृती करून या कोविड केअर सेंटर मध्ये दाखल झालेल्या रुग्णांना स्थानिक लोकांच्या सहकार्यातून तसेच समाजसेवी संस्थेच्या माध्यमातून बदाम […]

ताज्याघडामोडी

श्री सिद्धसिंहासन पीठाधीश श्रीगुरु गुंडा महाराज सिद्धर्स उदगीरकर यांची वैद्यकीय साहित्याची मदत

आज दि 23।05।2021 मोहिनी एकादशी रविवार रोजी श्री सिद्धसिंहासन पीठाधीश श्रीगुरु गुंडा महाराज सिद्धर्स उदगीरकर यांनी पंढरपुर उपजिल्हा रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ श्री अरविंद गिराम यांना संपर्क करुन रुग्णालयातील तात्काळ निकडीच्या व अत्यावश्यक वैद्यकीय वस्तुंची यादी मागवुन घेतली होती. डॉ श्री अरविंद गिराम यांच्या मागणी प्रमाणे श्री गुरु गुंडा महाराज उदगीरकर यांनी रुग्णा साठी […]

ताज्याघडामोडी

घरात करंट उतरल्याने लागली आग, मायलेकीचा होरपळून मृत्यू

बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील किट्टी आडगाव येथे रविवारी सकाळी घरात करंट उतरल्याने मायलेकीचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली. किट्टी आडगाव येथील पाटील गल्ली येथे राहत असलेल्या शशिकलाबाई शंकरराव फपाळ (वय65) व त्यांची लेक सखुबाई शेषराव फपाळ (वय45) या दोघी राहत असत.सकाळी सहा वाजता उठल्यानंतर शशिकलाबाई यांचा हात भिंतीला लागल्याने त्यांना करंट लागला हे पाहण्यासाठी मुलगी […]

ताज्याघडामोडी

1 जूननंतर लॉकडाऊन वाढणार? आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले महत्त्वाचे संकेत

कोरोना विषाणूचा देशात आणि राज्यात वाढणारा संसर्ग पाहता प्रशासनाकडून लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. ज्यानंतर महाराष्ट्रातील रुग्णसंख्या काही अंशी अटोक्यात येताना दिसत आहे. आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाच्या याच प्रयत्नांच्या बळावर कोरोना रुग्णसंख्येचा आलेख राज्यात उतरणीला लागला आहे. पण, असं असलं तरी अद्यापही कोरोनाचं संकट मात्र टळलेलं नाही. त्यामुळे प्रशासनाकडून अतिशय सावधगिरीनं पावलं उचलण्यात येणार आहेत. जवळपास […]

ताज्याघडामोडी

दहावीच्या विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यास करावा लागणार?

नागपूर : राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने राज्य सरकारने टाळेबंदीची घोषणा केली. याशिवाय विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून दहावीची परीक्षा रद्द केली. मात्र, या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. याबाबत उच्च न्यायालयाने या निर्णयावर ताशेरे ओढत, निर्णय कसा घेतल्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांवर पुन्हा अभ्यास सुरू करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. मात्र, आता […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

गुजरातला जाणाऱ्या कारमध्ये नोटांचं घबाड, सकाळपासून नोटा मोजता मोजता उलटली संध्याकाळ; अधिकारीही चक्रावले

राजस्थानच्या डुंगरपूर येथे दिल्लीहून गुजरातला जाणारी एक कार पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारची तपासणी करण्यात आली असता त्यात नोटांचं घबाड सापडलं. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या नोटा मोजण्यास सुरुवात केली. सकाळपासून या नोटांची मोजणी सुरु होती. नोटा एवढ्या प्रमाणावर होत्या की नोटा मोजता मोजता संध्याकाळ उलटली. त्यामुळे पोलीस आणि अधिकारीही चक्रावून गेले. कोट्यवधी रुपये घेऊन निघालेली ही […]

ताज्याघडामोडी

औषधं आणायला गेलेल्या तरुणाचा मोबाईल फोडला, कानशिलात हाणली; जिल्हाधिकाऱ्यांची अरेरावी कॅमेरात कैद

कोरोना काळात नागरिक लॉकडाऊनच्या नियमांचं सर्रास उल्लंघन करताना दिसतात. मग अशा वेळी पोलिसांकडून दंडूका उगारला जातोय. पण काही वेळा प्रशासनातील उच्च अधिकाऱ्यांकडून आपल्या अधिकारांचा गैरवापर केला जातोय आणि निरापराध्यांना त्याचा फटका बसतो. असाच काहीसा प्रकार छत्तीसगडमध्यील सुरजपूर जिल्ह्यातील जिल्हाधिकारी रणवीर शर्मा यांनी केलाय. आई-वडिलांसाठी मेडिकल स्टोअरमधून औषधं आणायला गेलेल्या युवकाला प्रिस्क्रिप्शन दाखवूनही मारण्यात आलं, त्याचा […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

“तेरा मेरा साथ’ म्हणत चक्क 13 जणांशी केलं लग्न; सगळ्या मुलांना लुटलं; अखेर पोलिसांनी पकडलं.

‘तेरा’ साथ है तो, मुझे क्‍या कमी हैं’, अशी विवाहाबद्दलची भावना कुठं आणि विवाह करुनही समाधानी न राहणाऱ्या, एकामागून एक 13 विवाह करत 13 नवरदेव आणि त्यांच्या कुटुंबांना लुटणाऱ्या एका लालची तरुणीला अखेर नंदुरबार पोलिसांनी हातकडीच्या बंधनात बांधलं आहे. ‘सोनू, तुझा माझ्यावर भरोसा नाय का?’ या गाजलेल्या गाण्यातील सोनू हेच या तरुणीचं नाव असून तिनं […]

ताज्याघडामोडी

कोविड रूग्णालयात शासकीय दरपत्रक सक्तीने लावून घ्या

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने लहान मुलांना जास्त धोका असल्याचे सांगितले आहे. लहान मुलांचा एचबी कमी असल्यास त्यांना अधिक संसर्ग होण्याची भीती असल्याने जिल्ह्यातील 18 वर्षे वयाखालील सर्व मुलांची हिमोग्लोबिन तपासणी करणार असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे सांगितले. नियोजन भवन येथे कोरोनाविषयक आढावा बैठकीत श्री. भरणे बोलत होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, […]