गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सावधान! कोणी तुमच्या नावावर बनावट SIM कार्ड तर वापरत नाही ना? पाहा कसं कराल ब्लॉक

नवी दिल्ली, 23 मे : अनेकदा अशा घटना समोर आल्या आहेत, ज्यात लोकांनी त्यांच्या आयडीच्या प्रुफच्या आधारे, कोणी बनावट सिमचा वापर करत असल्याच्या तक्रारी केल्या आहेत. देशात अनेकदा गुन्हेगार बनावट सिम कार्डचा वापर करतात आणि त्या कामासाठी चुकीच्या पद्धतीने सिम मिळवतात. त्यामुळे तुमच्या नावावर कोणी बनावट, खोटं सिम कार्ड तर वापरत नाही ना, हे पाहाणं गरजेचं आहे.

ऑनलाईन मिळेल माहिती

भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने लोकांच्या या समस्या सोडवण्यासाठी एक ऑनलाईन पोर्टल लाँच केलं आहे. कोणतीही व्यक्ती tafcop.dgtelecom.gov.in या वेब पोर्टलवर जाऊन सहजपणे, त्यांच्या नावावर किती सिम कार्ड वापरले जात आहेत, याची माहिती घेऊ शकतात.

तुमच्या आयडी प्रुफच्या आधारे कोणी दुसरा व्यक्ती, एखाद्या बनावट सिमचा वापर करत असेल, तर तुम्ही पोर्टलच्या माध्यमातून त्या नंबरला ब्लॉक करू शकता. एका आयडी प्रुफच्या आधारे जास्तीत-जास्त 9 सिम कार्ड जारी केले जाऊ शकतात.

काय आहे प्रोसेस –

– सर्वात आधी वेब पोर्टल tafcop.dgtelecom.gov.in वर क्लिक करा

– त्यानंतर वेबसाईटवर तुमचा मोबाईल नंबर टाका.

– आता मोबाईल नंबरवर वेरिफिकेशनसाठी एक ओटीपी येईल.

– ओटीपी टाकल्यानंतर तुमचा नंबर वेरिफाय होईल.

– त्यानंतर स्क्रिनवर त्या नंबर्सची लिस्ट समोर येईल, जे तुमच्या आयडी प्रुफवर चालवले जात आहेत.

– जर तुमच्या नावावर कोणी बनावट सिम चालवलं जात असेल, तर तुम्ही त्याबाबत रिपोर्ट करू शकता.

– पोर्टलवर तुमची तक्रार दाखल केली जाईल आणि त्याची चौकशीही होईल.

– तक्रार योग्य असल्यास समोर आल्यास, तो नंबर ब्लॉक केला जाईल.

– त्यानंतर बनावट नंबरची चौकशी होईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *