राजस्थानच्या डुंगरपूर येथे दिल्लीहून गुजरातला जाणारी एक कार पोलिसांनी ताब्यात घेतली. या कारची तपासणी करण्यात आली असता त्यात नोटांचं घबाड सापडलं. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या नोटा मोजण्यास सुरुवात केली. सकाळपासून या नोटांची मोजणी सुरु होती. नोटा एवढ्या प्रमाणावर होत्या की नोटा मोजता मोजता संध्याकाळ उलटली. त्यामुळे पोलीस आणि अधिकारीही चक्रावून गेले.
कोट्यवधी रुपये घेऊन निघालेली ही कार दिल्लीहून गुजरातला जात होती, असं सांगितलं जातं. तसेच हा सर्व पैसा हवाल्याचा असल्याचाही प्राथमिक अंदाज आहे.